Delhi Mumbai Vadodara Expressway : सध्या संपूर्ण देशभरात वेगवेगळ्या महामार्गांचे काम प्रगतीपथावर आहे. या महामार्गामुळे देशाच्या विकासाला अजूनच गती मिळत आहे. नुकत्याच आपल्या महाराष्ट्रात देखील महाराष्ट्रासाठी अति महत्त्वाचा असा समृद्धी महामार्ग देखील अंतिम टप्प्यात दाखल झाला आहे.
या महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण येत्या 11 डिसेंबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. दरम्यान आता महाराष्ट्रासाठी अजून एक महत्त्वाचा महामार्ग म्हणजे दिल्ली-वडोदरा-मुंबई द्रुतगती मार्ग राजस्थानच्या दौसा जिल्ह्यापर्यंत पूर्ण झाला आहे.
हा महामार्ग राजधानी जयपूरपासून केवळ 65 किलोमीटर अंतरावर आहे. हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर थेट दिल्ली आणि जयपूरला जोडणार असून जयपूर ते दिल्ली हा प्रवास सुमारे 3 तासांनी कमी होणार आहे, विशेष म्हणजे हे अंतर अवघ्या 2 तासात पूर्ण होणार आहे. सध्या हे अंतर पार करण्यासाठी 5 तास लागत आहेत. यामुळे सदर महामार्गामुळे जयपूर ते दिल्ली प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सोयीचे होणार आहे. या महामार्गामुळे केवळ लोकांनाच फायदा होणार नाही तर दोन्ही शहरांमधील व्यापार आणि पर्यटनालाही चालना मिळणार आहे.
दिल्ली अब दूर नही…! :- या महामार्गाचे बांधकाम वेगाने पूर्ण होत आहे. हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर दिल्ली-मुंबई प्रवासाचा वेळ २४ तासांवरून १२ तासांवर येणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे निश्चितच या महामार्गामुळे दिल्ली अब दूर नही अशी परिस्थिती बनणार आहे. या एक्स्प्रेस वेवर ताशी 120 किमी वेगाने गाड्या धावतील. निश्चितच या महामार्गावर गतीचा थरार पाहायला मिळणार आहे.
त्यामुळे प्रवासाला गती लाभणार आहे. या एक्स्प्रेस वेचा सुमारे 375 किलोमीटरचा रस्ता राजस्थानमधून जाणार आहे. या एक्स्प्रेस वेमध्ये एक लेन इलेक्ट्रिक वाहनांसाठीही असेल. भारतात असं पहिल्यांदाच घडणार आहे. एक्स्प्रेस वेवर सध्या 8 लेन आहेत पण नंतर आणखी चार लेन जोडता येणार आहेत. निश्चितच इलेक्ट्रिक वाहनांसाठी स्पेशल लेन असणारा हा देशातील एकमात्र महामार्ग राहणार आहे.
महामार्ग कुठून जाणार :- हा महामार्ग दिल्ली, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रातून जाणार आहे. नवी दिल्ली, फरिदाबाद, बल्लभगड, सोहना, अलवर, दौसा, सवाई माधोपूर, कोटा, मंदसौर, रतलाम, दाहोद, गोध्रा, वडोदरा, भरुच, सुरत, नवसारी, वलसाड, विरार आणि मुंबई या देशातील प्रमुख शहरांमधून या महामार्गाचे जाळे पसरलेले राहणार आहे.
महामार्गाची वैशिष्ट्ये तर जाणून घ्या :- पुढील 50 वर्षांसाठी हा रस्ता तयार करण्यात येत आहे. हा रस्ता जर्मन तंत्रज्ञानाने बनवला जात आहे. हा देशातील पहिला स्ट्रेचेबल रस्ता असेल. रस्त्यावर प्रत्येक 500 मीटरवर सीसीटीव्ही कॅमेरे असतील. त्यात कॅमेरेही असतील. हायवे उंच प्लॅटफॉर्मवर बांधला जात आहे. संपूर्ण महामार्गावर स्पीड ब्रेकर असणार नाही. शिवाय जनावरांना प्रवेश रोखण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. अपघात टाळण्यासाठी विश्रांतीची ठिकाणे वगळता कोठेही वाहन थांबविण्यास परवानगी दिली जाणार नाही.
टोल किती असेल बरं :- या महामार्गावर प्रवेश करताना टोल लागणार नाही, मात्र बाहेर पडताना टोल लागेल. येथे प्रति किमी दराने टोल घेतला जाईल, याचा अर्थ आपण महामार्गावर चालत असलेल्या किमीसाठी इतकाच टोल भरावा लागेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिल्ली-वडोदरा एक्सप्रेसवेवर, टोल प्रति किलोमीटर 0.65 पैसे असेल, जो देशातील इतर रस्त्यांच्या तुलनेत खूपच कमी आहे. दुसरीकडे, मिनी बससाठी 1.05 रुपये, बस आणि ट्रकसाठी 2.20 रुपये, जेसीबी सारख्या अवजड यंत्रासाठी 3.45 रुपये आणि इतर अवजड वाहनांसाठी 4.20 रुपये आकारले जातील.