स्पेशल

Google News Initiative च्या मदतीने Ahmednagarlive24 ची डिजिटल प्रगती

आजच्या जगात डिजिटल बदलांमुळे बातम्यांचं स्वरूप बदलत आहे. अशा परिस्थितीत अहमदनगर लाईव्ह २४ ही बातम्यांची वेबसाइट गूगल न्यूज इनिशिएटिव्हच्या भारतीय भाषा कार्यक्रमात सहभागी होऊन आघाडीवर आली आहे. या कार्यक्रमामुळे अहमदनगर लाईव्ह २४ ला डिजिटल क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन मिळाले आणि त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे वाचकांची संख्या आणि त्यांचा वेबसाइटवरचा वेळ वाढण्यात मदत झाली आहे.

पहिली स्टेज: निवड आणि सल्लागाराची मदत
या प्रवासाला सुरुवात झाली GNI च्या भारतीय भाषा कार्यक्रमात अहमदनगर लाईव्ह २४ ची निवड होऊन. यामुळे Readwhere आणि Google News Initiative च्या तज्ज्ञांकडून सल्ला मिळाला. या सल्ल्यामुळे अहमदनगर लाईव्ह २४ ला त्यांच्या वाचकांच्या गरजा आणि आवडीच्या अनुसार त्यांची वेबसाइट सुधारण्यासाठी मदत मिळाली.

मार्गदर्शन आणि टेक्नॉलॉजी अपग्रेडेशन
या कार्यक्रमाचा महत्वाचा भाग म्हणजे टेक्नॉलॉजीवर आधारित मार्गदर्शन सत्र होते. या सत्रातून अहमदनगर लाईव्ह २४ च्या टीमला Google Analytics 4 (GA4), Google AdSense आणि YouTube Shorts यासारख्या विषयांची माहिती मिळाली. यामुळे त्यांना वाचकांना काय हवं हे समजून घेण्यास मदत झाली

दुसरी स्टेज : मोबाईल अँप डेव्हलपमेंट
यापुढील टप्प्यात वेबसाइट आणि अॅप बनवण्यावर लक्ष केंद्रित केले. यामुळे वाचकांना सोयीस्कर असा अनुभव मिळवण्यासाठी त्यांची वेबसाइट आणि अॅप बनवण्यात आले. यामुळे वाचन आणि वेबसाइट लोड होण्याची वेग वाढण्यासारख्या सुविधा मिळाल्या आहेत.

परिणाम : वाढती वाचकसंख्या आणि सुधारलेला अनुभव
Readwhere आणि Google News Initiative च्या मार्गदर्शनामुळे झालेल्या बदलांमुळे अहमदनगर लाईव्ह २४ ला वाचकांची संख्या वाढण्यात मदत झाली. गूगल न्यूज इनिशिएटिव्हच्या मदतीमुळे अहमदनगर लाईव्ह २४ ची वेबसाइट आणि वाचकांचा अनुभव दोन्ही सुधारला आहे.

वाचकांचा सकारात्मक प्रतिसाद आणि वाढती वाचक संख्या हेच अहमदनगर लाईव्ह २४ च्या यशस्वी डिजिटल प्रगतीचे उदाहरण आहे. अखेरीस, गूगल न्यूज इनिशिएटिव्हच्या भारतीय भाषा कार्यक्रमात सहभागी झाल्यामुळे अहमदनगर लाईव्ह २४ ला डिजिटल क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी खूप मदत मिळाली आहे.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com

Published by
Tejas B Shelar

Recent Posts