Vastu Tips:- प्रत्येक व्यक्ती नोकरी किंवा व्यवसाय करतात किंवा इतर कामांच्या माध्यमातून खूप कष्ट घेतात व मोठ्या प्रमाणावर पैसे कमवतात. परंतु इतका पैसा कमवून देखील कायम बऱ्याच जणांना जीवनामध्ये पैशांची चणचण भासते व कायमच आर्थिक समस्या येत राहतात.
यामध्ये कुठे नेमकी चूक होते? याचा शोध घेऊन देखील त्यामागील प्रमुख कारण आपल्याला सापडत नाही. जर या मागील प्रमुख कारण बघितले तर त्यामध्ये एक कारण वास्तुदोष असण्याची शक्यता असते.
आपल्याला माहित आहे की,वास्तुशास्त्रामध्ये सांगितले आहे की वास्तुदोष जर एखाद्या घरामध्ये असेल तर मात्र अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो व त्याकरिता अशा प्रकारचा वास्तुदोष नाहीसा करणे किंवा त्याला संपवणे हे खूप गरजेचे असते.
वास्तुशास्त्रामध्ये घरामध्ये कुठली वस्तू कुठे ठेवावी किंवा घराची रचना कशी असावी? याबाबत महत्त्वाची माहिती मिळते व त्या अनुषंगाने वास्तुशास्त्रानुसारच घराची अंतर्गत सजावट किंवा रचना तसेच घराचे बांधकाम करण्याकडे बऱ्याच जणांचा कल दिसून येतो.
यामध्ये जर वास्तुशास्त्रानुसार बघितले तर घरामध्ये पैसे कोणत्या दिशेला ठेवावे? याबद्दल देखील महत्त्वाची माहिती दिलेली आहे. वास्तुशास्त्रामध्ये पैसा ठेवण्याची जागा किंवा दिशा खूप महत्त्वाची भूमिका बजावते असे देखील सांगितले आहे. त्यामध्ये पैसे ठेवण्याची जागा जर योग्य दिशेने असेल तर कुटुंबामध्ये धन समृद्धी वाढण्यास मदत होते.
परंतु या उलट मात्र जर पैसे ठेवण्याची जागा चुकली किंवा ती योग्य जागा नसेल किंवा दिशा योग्य नसेल तर मात्र कितीही पैसा तुम्ही कमावला तरी देखील तो टिकत नाही व तुमचे नुकसान देखील होते. त्यामुळे या लेखात आपण बघू की वास्तुशास्त्रानुसार कोणत्या दिशेला पैसे ठेवणे शुभ आहे किंवा कोणत्या दिशेला ठेवू नयेत? याबद्दल माहिती दिली आहे.
वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये पैसे कोणत्या दिशेला ठेवावेत?
1- वास्तुशास्त्रानुसार बघितले तर घरामध्ये पैसे ठेवण्याची योग्य दिशा ही दक्षिण किंवा नैऋत्य आहे. तसेच पैशांची तिजोरी उत्तर दिशेला देखील तुम्हाला ठेवता येते. कारण उत्तर दिशा ही कुबेराची दिशा समजली जाते. तसेच पर्याय दुसरा पर्याय जर बघितला तर पश्चिम दिशा देखील यासाठी योग्य ठरते.
2- तसेच आर्थिक समृद्धी हवी असेल तर घरातील तिजोरी योग्य दिशेने ठेवणे महत्त्वाची असून तिजोरी ही दक्षिण दिशेला भिंतीला लागून ठेवणे शुभ असते.
3- वास्तुशास्त्रानुसार तिजोरीचे तोंड दक्षिणेकडे नसावे. यामध्ये असे म्हटले जाते की देवी लक्ष्मी दक्षिणेकडून प्रवास करते आणि उत्तरेकडे निवास करते. त्यानुसार जर तिजोरीचे दार जर या दिशेने उघडले तर लक्ष्मी थांबत नाही.
4- तसेच या सोबत वास्तुशास्त्रानुसार बघितले तर पैसे ठेवण्यासाठी तिजोरी किंवा कपाट उत्तर-पूर्व, दक्षिण-पूर्व आणि नैऋत्य कोपऱ्यामध्ये ठेवू नये. जर असे केले तर आर्थिक संकट येण्याची शक्यता असते व पैसा लवकर खर्च होतो असे मानले जाते.
5- तसेच तिजोरी कधीही मुख्य दरवाजाजवळ किंवा उजवीकडे ठेवू नये. असे जर केले तर देवी लक्ष्मी घरात वास करत नाही असे मानले जाते.
( टीप- वरील माहिती वाचकांकरिता माहितीस्तव सादर केली आहे. या माहिती विषया अहमदनगर लाईव्ह 24 कुठल्याही प्रकारचा दावा करत नाही किंवा या माहितीचे समर्थन देखील करत नाही.)