Driving License Application : वाहनधारकांसाठी आजची ही बातमी खूपच कामाची ठरणार आहे. टू व्हीलर असो किंवा फोर व्हीलर असो वाहन चालवण्यासाठी वाहन चालवण्याचा परवाना आवश्यक असतो. विना ड्रायव्हिंग लायसन्स गाडी चालवणे हा कायद्याने गुन्हा आहे. जो कोणी विना ड्रायव्हिंग लायसन्स गाडी चालवत असेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई होत असते.
त्यामुळे जर तुमच्याकडेही ड्रायव्हिंग लायसन्स नसेल तर आधी ड्रायव्हिंग लायसन्स काढून घ्या. जर तुम्ही विना ड्रायव्हिंग लायसन्स गाडी चालवली तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते. काही वेळा दंडात्मक कारवाई होते तर काही प्रसंगी तुरुंगवास देखील होऊ शकतो.
दरम्यान जर तुम्हालाही नवीन ड्रायव्हिंग लायसन्स काढायचे असेल मात्र ड्रायव्हिंग लायसन्स कसे काढायचे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर तुमच्यासाठी आजचा हा लेख कामाचा ठरणार आहे. खरंतर अलीकडे भारतात प्रत्येक शासकीय काम ऑनलाईन झाले आहे.
सर्वच ठिकाणी ऑनलाइन प्रणाली विकसित झाली आहेत. शासनाकडून उपलब्ध होणारे वेगवेगळे डॉक्युमेंट्स देखील आता ऑनलाईन मिळत आहेत. ड्रायव्हिंग लायसन्स देखील ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आले आहे. म्हणजे तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करणे हेतू कोणत्याचं शासकीय कार्यालयात हेलपाटे मारावे लागणार नाहीत आणि तुमची आर्थिक पिळवणूक होणार नाही.
आता तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्ससाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा हा प्रश्न पडला असेल. पण, चिंता करू नका आज आपण ड्रायव्हिंग लायसन्ससाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत. ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी सर्वप्रथम लर्निंग लायसन्ससाठी अर्ज करावा लागतो. लर्निंग लायसन्स मिळाले की मग तुम्हाला पर्मनंट ड्रायव्हिंग लायसन्स मिळते.
लर्निंग लायसन्ससाठी अर्ज कसा करायचा
यासाठी परिवहन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी लागणार आहे. sarathi.parivahan.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन तुम्ही लर्निंग लायसन्ससाठी अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला सर्वप्रथम वेबसाईटवर दिसत असलेल्या ऑनलाईन सेवा या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे.
यानंतर तुम्हाला लर्निंग लायसन्स लिंक वर जायचे आहे. यानंतर तुम्हाला तुमचे राज्य निवडायचे आहे मग अर्जदाराचा पर्याय निवडायचा आहे. मग तुम्हाला तुमचा बारा अंकी आधार क्रमांक आणि दहा अंकी मोबाईल नंबर प्रविष्ट करायचा आहे आणि जनरेट ओटीपी या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
यानंतर तुम्ही दिलेल्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल तो ओटीपी तुम्हाला दिलेल्या रकान्यात टाकायचा आहे. यानंतर सबमिटवर क्लिक करायचे आहे. मग तुमच्यापुढे एक अर्ज ओपन होईल तो अर्ज तुम्हाला काळजीपूर्वक भरावा लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला पासपोर्ट साईज आकाराचा फोटो आणि तुमची स्वाक्षरी अपलोड करावी लागणार आहे.
यानंतर तुम्हाला फी या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. लर्निंग लायसन्स साठी राज्य सरकारने ठरवून दिलेली फी आता तुम्हाला भरायची आहे. फि जमा केल्यानंतर तुम्हाला सबमिट ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. अशा तऱ्हेने तुमचा अर्ज जमा होणार आहे.
कोणकोणते कागदपत्र द्यावे लागणार ?
अर्जदाराचे आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो हे दोन महत्त्वाचे डॉक्युमेंट तुम्हाला सादर करावे लागणार आहेत. ही प्रक्रिया जवळपास पंधरा महिन्यांच्या कालावधीत पूर्ण होते.