Driving License : जगातील प्रत्येक देशात रस्ते सुरक्षा लक्षात घेऊन वाहन कायदा तयार करण्यात आला आहे. आपल्या भारतातही मोटार वाहन कायदा अस्तित्वात आहे. या कायद्यानुसार भारतात टू व्हीलर असो किंवा फोर व्हीलर असो कोणतेही वाहन चालवताना वाहन परवाना म्हणजेच ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक असते.
मात्र ड्रायव्हिंग लायसन्स काढण्याची प्रोसेस खूपच किचकट असते. यामुळे सर्वसामान्यांना ड्रायव्हिंग लायसन्स काढताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र आता ड्रायव्हिंग लायसन्स काढण्याची सुविधा खूपच सोपी करण्यात आली आहे.
यामुळे याचा सर्वसामान्य नागरिकांना फायदा होत आहे. जर तुम्हीही येत्या काही दिवसांनी ड्रायव्हिंग लायसन्स काढण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खास ठरणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार केंद्रातील सरकारने आता ड्रायव्हिंग लायसन्स काढण्याच्या नियमात मोठा बदल केला आहे.
नवीन नियमानुसार आता ड्रायव्हिंग लायसन्स काढण्याची प्रोसेस खूपच सोपी झाली आहे. विशेष म्हणजे हा नवीन नियम एक जून 2024 पासून लागू झाला आहे. आज आपण याच नवीन नियमाची माहिती पाहणार आहोत.
ड्रायव्हिंग लायसन्सचे बदललेले नियम
नवीन नियमानुसार आता सर्वसामान्यांना ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी आरटीओ मध्ये जाण्याची गरज राहिलेली नाही. रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने एक जून पासून नवीन नियम लागू केला आहेत.
या नवीन नियमानुसार आता ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी अर्जदार खाजगी ड्रायव्हिंग प्रशिक्षण केंद्रात जाऊन टेस्ट देऊ शकतात. आधी ड्रायव्हिंग टेस्ट देण्यासाठी आरटीओमध्ये जावे लागत होते पण आता अर्जदारांना सरकारमान्य खाजगी ड्रायव्हिंग प्रशिक्षण केंद्रात जाऊन ड्रायव्हिंग टेस्ट देता येणार आहे.
ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी किती फी लागते
लर्निंग लायसन्स (फॉर्म 3) : 150 रुपये.
लर्निंग लायसन्स री टेस्ट : 50 रुपये.
ड्रायव्हिंग टेस्ट (री टेस्ट): 300 रुपये.
ड्रायव्हिंग लायसन्स जारी : 200 रुपये.
आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग परमिट : 1,000 रुपये.
लायसन्समध्ये इतर वाहन वर्ग जोडण्यासाठी शुल्क : 500 रुपये.
ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू : 200 रुपये.
लेट रिन्यू : वार्षिक 300 रुपये + 1,000 रुपये
अर्ज कुठं करायचा
https://parivahan.gov.in/ या संकेतस्थळावर जाऊन नागरिकांना ड्रायव्हिंग लायसन्स साठी अर्ज करता येतो. याशिवाय नागरिक आरटीओ कार्यालयात जाऊन ड्रायव्हिंग लायसन्स साठी अर्ज करू शकणार आहेत.