स्पेशल

Earn Money By Mobile : आता नाही पैसे कमवायचे टेन्शन! तुमच्या हातातील मोबाईल वापरून तुम्ही कमावू शकतात पैसे, कसे ते वाचा?

Earn Money By Mobile :-जीवन जगत असताना माणसाला पैशाची आवश्यकता असते. पैसे कमवायचे म्हटले म्हणजे काहीतरी काम करणे गरजेचे आहे. त्याकरिता बरेच व्यक्ती कुठलातरी व्यवसाय करतात किंवा नोकऱ्यांमध्ये तरी असतात. म्हणजेच तुम्हाला एका ठराविक कालावधीत काम करून तुम्हाला पैसे मिळवता येतात. परंतु तुम्ही घरी बसून तुमच्या हातातील मोबाईलच्या मदतीने चांगला पैसा कमवू शकता हे जर तुम्हाला कोणी सांगितले तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही.

परंतु असे अनेक मार्ग आहेत की तुम्ही मोबाईलच्या माध्यमातून देखील चांगला पैसा घरी बसून मिळवू शकतात. कारण आजचे युग हे तंत्रज्ञानाचे इंटरनेटचे युग असल्याकारणाने तुम्ही बऱ्याच पद्धतीचे कामे ऑनलाईन पद्धतीने काम करून चांगला पैसा मिळवू शकता. या अनुषंगाने आपण या लेखांमध्ये काही  महत्त्वाचे मार्ग पाहणार आहोत ज्या माध्यमातून तुम्ही तुमच्या मोबाईलच्या साह्याने चांगला पैसा मिळवू शकता.

 मोबाईलच्या मदतीने घरी बसून कमवा पैसे

1- ब्लॉगिंग तुम्हाला कुठल्याही विषयावर माहिती हवी असेल तर तुम्ही गुगलवर सर्च केली तरी तुम्हाला ती मिळते. या अनुषंगाने ब्लॉगिंग हा एक पैसे मिळवण्याचा चांगला मार्ग आहे. तुम्हाला जर एखाद्या विषयाचे चांगले ज्ञान असेल तर तुम्ही यावर चांगल्या पद्धतीचे लेखन करून इंटरनेटच्या मदतीने ब्लॉगींगचे काम करू शकतात. ब्लॉगिंग च्या मदतीने तुम्ही  तुमचे लिखाण प्रकाशित करून ते गुगलच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवू शकतात. यात तुमच्या लिहिलेल्या ब्लॉगला जर चांगले व्ह्यूज किंवा रिच आले तरी तुम्हाला गुगलच्या माध्यमातून पैसे मिळतात.

2- कंटेंट रायटर असे अनेक व्यक्ती आहेत की त्यांच्या विविध विषयांवर वेबसाईट आहेत किंवा ते ब्लॉगर आहेत. अशा व्यक्ती देखील तुम्हाला घरी बसून  एखाद्या विषयावर लेख म्हणजेच कन्टेन्ट लिहीण्याचे काम देऊ शकतात. याकरिता तुम्ही एखाद्या ब्लॉग मध्ये किंवा वेबसाईटमध्ये कॉन्टॅक्ट अस येथून कुठल्याही वेबसाईट किंवा ब्लॉगरशी कॉन्टॅक्ट करून कंटेंट रायटर चे काम मिळवू शकतात. हा देखील घरी बसून इंटरनेटच्या मदतीने पैसे कमावण्याचा चांगला मार्ग आहे.

3- संलग्न मार्केटिंग(ऍफिलिट मार्केटिंग)- या प्रकारामध्ये कोणत्याही कंपनीचे उत्पादन किंवा सेवा ही जर विक्री केली तर त्या माध्यमातून कमिशन मिळते. म्हणजेच कंपनीचे उत्पादन आणि सेवा जितकी जास्त प्रमाणात विकली तितके जास्त प्रमाणात तुम्हाला कमिशन मिळू शकते. अलीकडच्या काळामध्ये एपीलेट मार्केटिंग अर्थात संलग्न मार्केटिंगचे प्रमाण खूप वाढले असून प्रत्येकाला आता ऑनलाइन शॉपिंग मोठ्या प्रमाणावर करायला आवडते. त्यामुळे तुम्ही देखील अफिलेट मार्केटिंग केले तरी घरी बसून चांगला पैसा कमिशनच्या माध्यमातून कमवू शकतात.

4- मोबाईल ॲप्लिकेशनच्या मदतीने तुमच्या मोबाईल मध्ये असे अनेक प्रकारचे ॲप असतात त्या माध्यमातून देखील तुम्ही चांगला पैसा मिळवू शकतात. परंतु यामध्ये तुम्हाला ॲप रियल आहे की बनावट आहे याबद्दलची महत्त्वाची काळजी घेणे गरजेचे असते. त्यामुळे या प्रकारचा मार्ग अवलंबण्या अगोदर सदर अँपची पूर्ण काळजीपूर्वक चौकशी करूनच त्या ॲपचा वापर करणे गरजेचे आहे. यामध्ये गुगल ओपिनियन रिवार्ड, एम पी एल, अर्न टॉक टाईम, टास्क बड सारख्या मोबाईल ॲप्लिकेशन चा वापर करून ऑनलाईन पैसे मिळवू शकतात. हे ॲप पूर्णपणे सुरक्षित आहेत.

5- ऑनलाइन फोटोग्राफ विक्री जर तुम्हाला फोटो काढण्यामध्ये आवड असेल तर तुम्ही तुमचा मोबाईलचा वापर करून भरपूर कमाई करू शकतात. याकरिता फक्त तुमच्या स्मार्टफोनमध्ये उत्तम क्वालिटीचा कॅमेरा असणे गरजेचे आहे व तुम्ही काढलेला फोटो युनिक असावा. आजकाल आपण सोशल मीडियावर पाहतो की निसर्ग, विविध ठिकाणच्या प्रवासाच्या फोटो तसेच खाद्यपदार्थांच्या फोटोला देखील खूप मागणी आहे. गुगल या सर्च इंजिनवर अनेक प्रकारचे वेबसाईट आणि एप्लीकेशन आहे जे अशा पद्धतीचे फोटो विक्रीचे काम करतात.

यामध्ये असलेल्या महत्त्वाच्या आणि विश्वसनीय ॲपचा विचार केला तर शटर स्टॉक, कंट्रीब्यूटर, ड्रीम्सटाईम इत्यादी ॲपचा समावेश होतो. यासाठी संबंधित एप्लीकेशन वर किंवा वेबसाईटवर तुम्हाला तुमचे खाते तयार करावे लागते आणि त्या ठिकाणी तुम्ही काढलेला फोटो अपलोड करावा लागतो. जर तुमचा फोटो दर्जेदार आणि उत्तम असेल तर ही फोटो विकणारी वेबसाईट स्वतः तुमची प्रतिमेची जाहिरात करते आणि तुम्हाला पन्नास डॉलर ते शंभर डॉलर्स पर्यंत पैसे देते. या माध्यमातून देखील तुम्ही वीस हजार ते 25 हजार रुपये पर्यंत सहज कमाई करू शकतात.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts