Edible Oil Price Update :- देशामध्ये मागील काही दिवसांपासून आपण पाहत आहोत की, अनेक जीवनावश्यक वस्तू जसे की खाद्यतेल, तूर डाळ इत्यादींच्या किमती सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेलेल्या आहेत. तसेच पेट्रोल आणि डिझेल आणि स्वयंपाकाचा गॅस देखील प्रचंड प्रमाणात महाग झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला फार मोठा आर्थिक झटका बसला. यामध्ये खाद्यतेलाच्या दराने तर गेल्या अनेक वर्षापासून चे रेकॉर्डस तोडले होते.
जर यामध्ये आपण सोयाबीनच्या तेलाचा विचार केला तर चक्क ते 175 ते 180 रुपये किलो पर्यंत गेलेले होते. परंतु आता आंतरराष्ट्रीय बाजारातील काही महत्त्वाच्या घडामोडी, सोयाबीन आणि सूर्यफूल चे बाजारपेठेतील दर आणि इतर काही कारणांमुळे खाद्यतेलाच्या दरामध्ये गेल्या महिन्याच्या तुलनेत बऱ्यापैकी घसरण झाली असून सर्वसामान्य नागरिकांना आता यामुळे दिलासा मिळाला आहे.
खाद्यतेलाच्या दरात घसरण
याबाबतचे सविस्तर माहिती अशी की, सोयाबीन आणि सूर्यफूल या खाद्यतेलाच्या दरामध्ये गेल्या महिन्याच्या तुलनेत तीस रुपयांनी घसरण झाली असून सर्वसामान्य नागरिकांना यामुळे दिलासा मिळाला आहे. जर आपण मागच्या महिन्याचा विचार केला तर सोयाबीनचे तेल हे 130 ते 135 रुपये किलो या दराने मिळत होते. परंतु आता त्यामध्ये घसरण होऊन ते 105 रुपये किलो पर्यंत खाली आले आहे.
यामागे बरीच कारणे असून त्यातील महत्त्वाचे म्हणजे विदेशातून खाद्यतेलाच्या आवकेत झालेली वाढ, आंतरराष्ट्रीय बाजारात असलेली मागणी आणि देशभरात झालेले एकूण तेल बियांचे उत्पादन यामुळे हे दर खाली आलेले आहेत. प्रामुख्याने या बाबींवरच खाद्यतेलाचे दर ठरत असतात. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा विचार केला तर भारतामध्ये प्रामुख्याने सोयाबीन आणि पाम तेलाची आवक ही अर्जेंटिना, ब्राझील, मलेशिया आणि इंडोनेशिया या देशातून प्रामुख्याने होत असते. जवळजवळ ही आवक 70 टक्के इतकी आहे.
परंतु नेमके याच देशांमध्ये खाद्यतेलाचे भाव घसरले आहेत व त्यामुळे या देशातून होणारी तेलाची आवक देखील मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. हे एक महत्त्वाचे कारण खाद्यतेलाच्या दर घसरणीसाठी कारणीभूत आहे. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे सोयाबीनचे बाजारपेठेतील जर बाजार भाव पाहिले तर ते देखील घसरले असून मागच्या वर्षाच्या संपूर्ण हंगामामध्ये पाच हजार रुपये क्विंटलच्या आसपास सोयाबीन विकले गेले आहे. यामुळे देखील सोयाबीन तेलाच्या दरात मोठी घसरण झालेली आहे.
तशीच परिस्थिती सूर्यफूल तेलाच्या बाबतीत देखील आहे. जर काही महिन्यांची तुलनात्मक आकडेवारी पाहिली तर तीन महिन्यांपूर्वी सोयाबीन आणि सूर्यफुल तेलाचे एक लिटरचे तेलाचे पाऊच घ्यायचे असेल तर त्यासाठी 170 ते 185 रुपये मोजावे लागत होते. परंतु आता ते एक लिटरचे पाऊच 100 ते 110 रुपयांपर्यंत खाली आले आहे. अजून एक दोन महिने तरी सोयाबीन तेलाचे दर स्थिर राहतील अशी शक्यता खाद्यतेल व्यवसायिकांकडून वर्तवण्यात आले आहे.
धारा या ब्रँडच्या मदर डेरी या कंपनीने देखील उतरवले खाद्यतेलाचे दर
मदर डेअरीचा ब्रँड असलेल्या धारा या खाद्यतेलाच्या प्रतिलिटर दर दहा रुपयांनी कमी करण्याची घोषणा कंपनीने केलेली आहे. एवढेच नाही तर सुधारित किमतीचे पॅकिंग देखील आता बाजारपेठेत उपलब्ध करण्यात आलेले आहे. मदर डेअरी दुग्धजन्य पदार्थांसोबतच धारा ब्रँडच्या माध्यमातून खाद्य तेलाची देखील विक्री करते. या पार्श्वभूमीवर कंपनीने म्हटले आहे की जागतिक बाजारपेठेमध्ये खाद्यतेलाच्या दरात घसरण झाल्यामुळे धारा ब्रँडच्या तेलाच्या किमतीत देखील कपात करण्यात आलेली आहे. कंपनीने खाद्यतेलाच्या दरात कपात केल्यानंतर आता धारा या ब्रँडचे रिफायन्ड तेल प्रति लिटर दोनशे रुपयांच्या आसपास खाली आलेले आहे.
काही महत्त्वपूर्ण तेलबिया आणि त्यांच्या खाद्यतेलाचे भाव
या माध्यमातून जर आपण काही महत्त्वाचे तेलबिया पिके आणि त्यांच्या खाद्यतेलाच्या भावांचा विचार केला तर यामध्ये मोहरी तेलबियांच्या बाजारभाव सध्या 4780 ते 4880 रुपये प्रति क्विंटल असून भुईमुगाचे बाजारपेठेतील दर 6300 ते 6360 रुपये प्रति क्विंटल आहेत. तसेच शेंगदाणा तेलाचे दर पाहिले तर शेंगदाणा तेल ऑइल मिल मधूनचे वितरण( गुजरात राज्य) पंधरा हजार 700 रुपये प्रति क्विंटल तर शेंगदाणा रिफाईंड तेलाचा एक डब्बा 2365 ते 2630 रुपयाला मिळत आहे.
तसेच मोहरीचे तेल दादरी 1150 रुपये प्रति क्विंटल असून मोहरी पक्की घनी तेलाचा एक डब्बा 1565 ते 1645 रुपयाला मिळत आहे. तसेच मोहरी कच्ची घनी तेलाचा डब्बा पंधराशे पासष्ट ते 1675 रुपयांना मिळत आहे. तसेच सोयाबीन तेलाच्या ऑइल मिल दिल्ली या ठिकाणाचे वितरणाचे दर पाहिले तर ते 9600 रुपये प्रति क्विंटल इतके आहेत. तसेच सोयाबीन ऑइल मिल वितरण इंदोर चे दर 9350 रुपये प्रति क्विंटल इतके आहेत. यासोबतच पामोलीन आरबीडी, दिल्लीचे दर 9250 रुपये प्रति क्विंटल असून पामोलीन एक्स- कांडला चे दर जीएसटी शिवाय 8350 रुपये प्रति क्विंटल इतके आहे.