स्पेशल

एक शेतकरी एक डीपी योजना पुन्हा सुरु; कसा घेणार योजनेचा लाभ, वाचा सविस्तर

Ek shetkari ek DP Yojana : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांसाठी कायमच नवनवीन कल्याणकारी योजना सुरू केल्या जातात. एक शेतकरी एक डीपी योजना देखील अशीच एक शेतकरी हिताची योजना आहे.

आता ही योजना पुन्हा एकदा सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून दिले जाते. म्हणजे एका शेतकऱ्याला एक स्वातंत्र ट्रान्सफॉर्मर या योजनेद्वारे मिळते. शेतकऱ्यांना नियमित आणि अखंडित वीज मिळावी यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. दरम्यान आता आपण या योजनेचे स्वरूप आणि या योजनेसाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची माहिती जाणून घेणार आहोत.

हे पण वाचा :- राज्य शासनाचा मोठा निर्णय! ‘त्या’ कर्जदार शेतकऱ्यांचे दहा कोटी रुपयांचे कर्ज माफ

एक शेतकरी एक डीपी योजनेचे स्वरूप

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून दिले जाते. यासाठी शेतकऱ्यांना मात्र स्वहिस्सा भरावा लागतो. सर्वसामान्य प्रवर्गातील शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत डीपी मिळवण्यासाठी सात हजार रुपये प्रति एचपी इतकी रक्कम भरावी लागते. तसेच एस सी आणि एसटी कॅटेगिरी मधील म्हणजेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना पाच हजार रुपये प्रति अश्वशक्ती म्हणजेच प्रति एचपी खर्च करावा लागतो.

इतकी रक्कम शेतकरी बांधवांनी भरल्यानंतर स्वातंत्र ट्रांसफार्मरसाठी येणारा अतिरिक्त खर्च हा राज्य शासनाच्या माध्यमातून दिला जातो. या योजने संदर्भात महावितरणच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दोन हेक्टर पेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत सर्वसामान्य प्रवर्गातील शेतकऱ्यांना 7000 आणि एससी एसटी प्रवर्गातील शेतकऱ्यांना 5000 प्रति एचपी इतका खर्च करावा लागतो.

तसेच या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांची पाच हेक्टरपेक्षा जास्त जमीन आहे अशा शेतकऱ्याला 11000 रुपये प्रति एचपी इतका खर्च करावा लागतो. यानंतर मग डीपी बसवण्यासाठी जो काही खर्च येतो तो खर्च राज्य शासनाच्या माध्यमातून अनुदान स्वरूपात संबंधित शेतकऱ्यांना मंजूर केला जातो आणि महावितरणला दिला जातो. म्हणजेच उर्वरित खर्चाचा भार हा राज्य शासनाच्या माध्यमातून वहन केला जातो.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी चिंताजनक! यंदा पाऊस बेताचाच, तीव्र दुष्काळाची परिस्थिती राहणार; पारनेरच्या ग्रामदैवत मंदिरातील होईकामधील…

3 Hp डीपीला किती पैसे लागतील?

दोन हेक्टर जमीन असलेला जर एखादा अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील शेतकरी असेल आणि त्याला या योजनेअंतर्गत लाभ घ्यायचा असेल तर त्याला पाच हजार प्रति एचपी इतका खर्च करावा लागेल. म्हणजेच जर त्याला तीन अश्वशक्ति म्हणजेच तीन एचपी चा ट्रांसफार्मर बसवायचा असेल तर त्याला एकूण 15 हजार रुपये खर्च करावा लागणार आहे.

तसेच जर सर्वसामान्य प्रवर्गातील कोणी शेतकरी असेल आणि दोन हेक्टर पेक्षा कमी जमीन असेल तर त्याला सात हजार रुपये प्रति अश्वशक्ती इतका खर्च करावा लागेल. म्हणजे जर त्याने तीन एचपी ची डीपी घेतली तर त्याला 21000 रुपये द्यावे लागतील उर्वरित पैसा हा शासन देईल.

जर मात्र एखादा पाच हेक्टर पेक्षा जास्त जमीन असलेला शेतकरी असेल तर त्याला 11000 रुपये प्रति एचपी इतका खर्च करावा लागणार आहे. म्हणजेच अशा शेतकऱ्यांनी जर तीन अश्वशक्तीची डीपी घेतली तर त्याला 33 हजार रुपये लागणार आहेत.

हे पण वाचा :- कांदा सानुग्रह अनुदानाबाबत महत्त्वाची बातमी; ‘या’ दिवशी खात्यात जमा होणार रक्कम, मंत्री भुसेंनी थेट तारीखच…

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे?

या योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी इतर काही शासकीय योजनेप्रमाणेच काही आवश्यक कागदपत्रांची पूर्तता शेतकऱ्यांना करावी लागणार आहे.

यामध्ये अर्जदार शेतकऱ्याला आधार कार्ड द्यावे लागेल.

अर्जदार शेतकऱ्याचे पॅन कार्ड, रेशन कार्ड

या योजनेचा लाभ शेतजमीन नावावर असलेल्या शेतकऱ्यांनाच होणार आहे. यामुळे सातबारा उतारा आणि आठ अ उतारा लागणार आहे.

शिवाय या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना विशेष लाभ दिला जाणार आहे. यामुळे जे शेतकरी बांधव या गटात मोडत असतील त्यांना जातीचा दाखला सादर करावा लागणार आहे.

याशिवाय शेतकरी बांधवांना आधारशी संलग्न असलेले बँक खाते क्रमांक देखील द्यावा लागेल, पासबुकची प्रत देखील लागणार आहे.

या योजनेबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी शेतकरी बांधव महावितरणच्या कार्यालयात संपर्क साधू शकतात व इतर सक्षम अधिकाऱ्यांशी, कृषी विभागाशी या योजनेबाबत संपर्क साधू शकणार आहेत. 

हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी चिंताजनक! यंदा पाऊस बेताचाच, तीव्र दुष्काळाची परिस्थिती राहणार; पारनेरच्या ग्रामदैवत मंदिरातील होईकामधील…

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts