स्पेशल

एकनाथ शिंदे यांनी अखेर ‘तो’ शब्द खराच करून दाखवला! 50 पैकी एकही पडला तर…… आज ठरला शब्द खरा

Vidhan sabha Nivadnuk Result 2024:- महाराष्ट्राच्या राजकारणामधील सगळ्यात मोठी राजकीय घटना ही जून 2022 मध्ये घडली होती. यावर्षी शिवसेनेमध्ये उभी फूट पडून एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे आमदार आणि अपक्ष असे मिळून 50 आमदार सोबत घेऊन बाहेर पडले होते.

त्यानंतर राज्यात मोठ्या प्रमाणावर राजकीय उलथा पालथ झाली व नंतर महायुतीचे सरकार स्थापन होऊन मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे विराजमान झाले होते. नंतर आपल्याला माहित आहे की उद्धव ठाकरे यांच्याकडील धनुष्यबाण हे चिन्ह ही निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांनाच दिले.

परंतु या सगळ्या घडामोडीनंतर असे म्हटले जात होते की जे आजपर्यंत शिवसेना सोडून गेले आहेत त्यांना मात्र निवडणुकीमध्ये पराभवाची चव चाखावी लागते व येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये जे बंडखोर आहेत त्यापैकी एकही आमदार निवडून येणार नाही असा दावा विरोधकांकडून केला जात होता.

परंतु आज लागलेल्या निकालाने हे सगळे दावे फोल ठरवले असून एकनाथ शिंदे यांनी या विधानसभा निवडणुकीत सगळ्याच ठिकाणी दणदणीत असा विजय मिळवला आहे.

कोणता शब्द खरा केला एकनाथ शिंदे यांनी?
राज्यामध्ये जेव्हा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सत्ता स्थापन झाली तेव्हा झालेल्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये एकनाथ शिंदे यांनी जेव्हा पहिलेच भाषण केले होते तेव्हा त्यांनी म्हटले होते की, आमच्या 50 मधील एकही आमदार आम्ही पडू देणार नाहीत. तसेच भाजपचे 115 आमदार म्हणून आम्ही 200 चा आकडा पार करू.

हा सभागृहात शब्द आहे आणि तसे नाही केले तर गावाला जाईन आणि शेती करेन असे एकनाथ शिंदे त्यावेळी म्हणाले होते. आज लागलेल्या निकालात जर आपण शिवसेनेने घेतलेल्या 55 जागांवरील आघाडीचा विचार केला तर त्यांचा स्ट्राइक रेट देखील वाढलेला आहे

महायुतीचा आकडा देखील 220 पेक्षा अधिक होताना दिसून येत आहे. त्यामुळे आजचा निकाल बघता एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिलेला शब्द खरा करून दाखवला असेच आपल्याला म्हणावे लागेल.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts