Electricity Bill : सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे सकाळी आणि रात्रीच्या वेळी वातावरणात गारवा जाणवतो. पण दुपारी मात्र अजूनही उकाडा भासतोय. उकाड्यामुळे पावसाच्या दिवसातही फॅन चालूचं ठेवावा लागतोय. आता फॅन, फ्रिज अशा वेगवेगळ्या उपकरणांचा वापर वाढतोय म्हणून विज बिलही वाढणारच आहे.
पण, आपण भारतीय सर्व वस्तू तर वापरतोच शिवाय बचत करण्याचाही प्रयत्न असतो. विज बिल कमी यावे यामुळे आपण सर्वजण बचतीचा प्रयत्न करतो. यासाठी वेगवेगळ्या आयडिया आपण शोधून काढतो.
अनेकजण विज बिल कमी यावे यासाठी फॅन कमी स्पीडने चालवतात. फॅन कमी स्पीडने चालवला तर विज बिल कमी येईल असे अनेकांचे म्हणणे आहे. पण हे खरे आहे का? हे आता आपण पाहणार आहोत.
तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे फॅन कमी स्पीड वर चालवला तर तुमचे वीज बिल कमीच येईल असे नाही. मुळात, पंख्याचा वेग हा रेग्युलेटरद्वारे नियंत्रित केला जातो. आपण फॅनचा वेग कमी करतो, म्हणून विजेचा वापर कमीच होईल असे नाही.
तर, तुमचा रेग्युलेटर कसा आहे ? त्यावर हे संपूर्ण गणित अवलंबून राहणार आहे. बाजारात दोन प्रकारचे रेग्युलेटर मिळतात. यातील एक रेग्युलेटर पंख्याचा स्पीड आणि विजेचा वापर दोन्ही गोष्टी नियंत्रणात आणते.
जर तुम्ही असे रेगुलटर वापरत असाल तर फॅनचा स्पीड कमी झाला तर विजेचा वापरही कमी होणार आहे. म्हणजे विजेचा वापर आणि स्पीड दोन्ही गोष्टी नियंत्रणात आणणारे इलेक्ट्रॉनिक रेगुलेटर जर तुम्ही वापरत असाल तर पंख्याचा स्पीड कमी केला तर आपोआप विजेचा वापर सुद्धा कमी होणार आहे.
म्हणजे तुम्ही कोणत्या प्रकारचा रेग्युलेटर वापरता आहात यावर तुमचे वीज बिल कमी येणार की नाही हे ठरणार आहे. तुम्हाला हे इलेक्ट्रॉनिक रेगुलेटर तुमच्या जवळच्या बाजारात सहजतेने मिळून जाईल, पण हे रेगुलेटर इतर सामान्य रेगुलेटर च्या तुलनेत आकाराने मोठे असते.
शिवाय याची किंमतही जास्त असते. हे रेग्युलेटर तुम्ही अमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या ऑनलाइन शॉपिंग साइटवरून देखील ऑर्डर करू शकता.