स्पेशल

कर्मचाऱ्यांसाठी कामाची बातमी ! सेवानिवृत्तीनंतर किंवा राजीनामा दिल्यानंतर ग्रॅच्युईटीची रक्कम कशा पद्धतीने काढतात?

Employee News : देशातील कर्मचाऱ्यांना ठराविक कालावधीसाठी सेवा बजावल्यानंतर ग्रॅच्युईटीचा लाभ देण्यात येतो. हा लाभ खाजगी तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना लागू होतो. आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की सरकारी किंवा खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर किंवा मध्येच राजीनामा दिल्यानंतर ग्रॅच्युइटीचा लाभ मिळू शकतो.

एखादा खाजगी किंवा सरकारी कर्मचारी सलग पाच वर्षे एखाद्या संस्थेत काम करतो तेव्हा तो ग्रॅच्युईटीसाठी पात्र ठरतो. अशा परिस्थितीत आज आपण सेवा समाप्तीनंतर किंवा मध्येच नोकरीला राजीनामा दिला तर कशा पद्धतीने ग्रॅज्युएटीची रक्कम काढायची, याची काय प्रोसेस असते याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, ग्रॅच्युइटी कायदा 1972 नुसार, कोणत्याही कंपनीला कर्मचाऱ्यांनी काम सोडल्यानंतर किंवा राजीनामा दिल्यानंतर तीस दिवसांच्या आत ग्रॅच्युइटी देणे बंधनकारक आहे. मात्र यासाठी कर्मचाऱ्यांनी तीस दिवसांच्या आत अर्ज करणे अपरिहार्य आहे. कर्मचारी स्वतः अर्ज करण्यास अक्षम असल्यास कर्मचाऱ्याने वारस लावलेला व्यक्ती अर्ज करू शकतो आणि ग्रॅच्यूटीचा लाभ त्याला मिळू शकतो.

आता तुम्ही म्हणत असाल एखाद्या कर्मचाऱ्याने 30 दिवसांपर्यंत ग्रॅच्यूटीसाठी अर्ज केला नाही तर त्याला ग्रॅच्यूटीची रक्कम मिळणार नाही का? तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की असं नाही 30 दिवसानंतर देखील कर्मचारी अर्ज करू शकतात आणि ग्रॅच्युइटीची रक्कम मिळू शकतात. एकंदरीत ग्रॅच्युईटी कंपनी नाकारू शकत नाही. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न ग्रॅज्युटी साठी अर्ज करण्याची प्रोसेस.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की ग्रॅच्यूटीसाठी 30 दिवसाच्या आत अर्ज करायचा असल्यास कर्मचाऱ्याला फॉर्म i भरावा लागणार आहे. तसेच जर कर्मचाऱ्याने आपला नॉमिनी म्हणून कोणाला नॉमिनेट केलं असेल तर त्या व्यक्तीला मात्र फॉर्म j भरावा लागेल. अर्ज कंपनीला सादर केल्यानंतर पंधरा दिवसांच्या आत कंपनीकडून संबंधितांना उत्तर दिलं जातं.

अर्जामध्ये दिलेली सर्व माहिती योग्य असेल तर कंपनी संबंधित व्यक्तीने दिलेली माहिती फॉर्म L मध्ये फिलअप करते. यानंतर कंपनीकडून एक डेट संबंधित व्यक्तीला दिली जाते ज्यादरम्यान संबंधितांना ग्रॅच्युइटी मिळत असते. कंपनीकडून दिली जाणारी डेट ही अर्ज सादर झाल्यानंतर तीस दिवसांच्या आत असते. एकंदरीत आपण असं म्हणू शकतो की ग्रॅच्युइटीसाठी अर्ज केल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याला तीस दिवसांच्या आत रक्कम मिळत असते.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts