Engineering Diploma:- जर आपण देशातील अभियांत्रिकी किंवा मेडिकल अभ्यासक्रमांसाठी लागणारे शुल्क बघितले तर ते प्रचंड प्रमाणात असल्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना इंजीनियरिंग किंवा मेडिकल मध्ये जाण्याची इच्छा असून देखील पैशा अभावी जाता येत नाही.
देशातील सर्वोच्च अभियांत्रिकी महाविद्यालयातून बी टेक करण्यासाठी JEE परीक्षा किंवा इतर अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असते. तसेच बी टेक करण्यासाठी साधारणपणे चार वर्षाचा कालावधी लागतो व त्यासाठीचे शुल्क देखील जास्त असते.
त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना या चार वर्षाच्या महाग अशा बीटेक कोर्सला प्रवेश घेता येत नाही असे विद्यार्थी दहावी किंवा बारावीनंतरचे इंजिनिअरिंग डिप्लोमा कोर्सेस म्हणजेच अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम करून कमी वेळेत चांगला पैसा मिळवून देणारी नोकरी करू शकतात.
इंजीनियरिंग डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर त्याचे प्रमाणपत्र मिळवल्यावर नोकरी शोधू शकतात व नोकरी तुम्हाला मिळू शकते. इंजिनिअरिंग डिप्लोमा केलेल्या तरुणांना अनेक कंपन्यांच्या माध्यमातून नोकरी ऑफर केल्या जातात. इंजिनिअरिंग डिप्लोमा कोर्सेसला प्रवेश मिळवणे देखील सोपे आहे.
हे आहेत इंजीनियरिंग डिप्लोमा अभ्यासक्रमांचे प्रकार
1- स्थापत्य अभियांत्रिकी पदविका
2- डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग किंवा यांत्रिक अभियांत्रिकी पदविका
3- डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल्स किंवा इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी पदविका
4- डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजीनियरिंग
5- डिप्लोमा इन कम्प्युटर सायन्स इंजीनियरिंग म्हणजे संगणक विज्ञान अभियांत्रिकी पदविका
6- डिप्लोमा इन ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग
7- डिप्लोमा इन टेक्सटाईल इंजीनियरिंग
8- डिप्लोमा इन फूड टेक्नॉलॉजी इंजीनियरिंग
इंजिनिअरिंग डिप्लोमा अभ्यासक्रमाचे फायदे काय?
तुम्हाला देखील जर इंजीनियरिंग डिप्लोमा कोर्सेसना म्हणजेच डिप्लोमा इन इंजीनियरिंगला ऍडमिशन घ्यायचे असेल तर त्या अगोदर अशा प्रकारचे अभ्यासक्रम करून तुम्हाला काय फायदा होऊ शकतो हे तुम्हाला माहित असणे तितकेच गरजेचे आहे. जर आपण अशा प्रकारच्या अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांचे फायदे बघितले तर ते….
1- यामुळे व्यावसायिक ज्ञान आणि कौशल्य वाढण्यास मदत होते.
2- एखाद्या उद्योग व्यवसायात प्रवेशाची तयारी आपल्याला या माध्यमातून करता येते.
3- उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध होतात.
4- कौशल्य विकास होण्याच्या दृष्टिकोनातून हे डिप्लोमा कोर्सेस फायद्याचे आहेत.
5- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अशा प्रकारचे डिप्लोमा कोर्सेस केल्यामुळे नोकरीच्या उत्तम संधी उपलब्ध होतात.
डिप्लोमा इन इंजीनियरिंग म्हणजेच अभियांत्रिकी पदविका पूर्ण केल्यानंतर कोणत्या क्षेत्रात करता येते करिअर?
डिप्लोमा इन इंजिनिअरिंग म्हणजेच अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर कनिष्ठ अभियंता, तंत्रज्ञ, सहाय्यक अभियंता, उत्पादन अभियंता म्हणजेच प्रोडक्शन इंजिनिअर, गुणवत्ता नियंत्रण अभियंता, संशोधन आणि विकास अभियंता, व्याख्याता/ प्राध्यापक इत्यादी पदांवर नोकरी मिळू शकते किंवा त्या क्षेत्रामध्ये करिअर करता येते.