स्पेशल

EPFO News : ईपीएफओ धारकांना आनंदाची बातमी ! पैसे झाले जमा ! तुमच्या खात्यात आले का ? असे करा चेक

EPFO News :- कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओ ही नोकरदार वर्गासाठी एक महत्त्वाची संघटना असून कर्मचाऱ्यांचे पीएफ अर्थात भविष्य निर्वाह निधी नियमनाचे महत्त्वपूर्ण काम या संघटनेच्या माध्यमातून पार पाडले जाते.

ईपीएफओ ही संघटना कायम सदस्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सोयी सुविधा पुरवते. सरकारी आणि खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा पगारामधून काही योगदान हे प्रॉव्हिडंट फंड मध्ये जमा होते आणि तितके योगदान हे नियोक्ता कंपनीकडून संबंधित व्यक्तीच्या खात्यामध्ये जमा केले जाते.

या पीएफ खात्यामध्ये जमा रकमेवर ईपीएफओकडून व्याज देखील दिले जाते. याच व्याजाच्या संदर्भात सध्या ईपीएफओ संघटनेच्या सदस्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे.

24 कोटी सदस्यांच्या खात्यात व्याज जमा

याबाबत सविस्तर वृत्त असे की, केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी ईपीएफो सदस्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली असून त्यानुसार कामगार मंत्रालय 2022-23 या आर्थिक वर्षाकरिता पीएफ सदस्यांना एकूण 8.15 टक्के व्याजदर देण्याच्या प्रयत्नात असून त्याचाच एक भाग म्हणून 24 कोटी खात्यांमध्ये 8.15% या व्याजदराने व्याज देखील देण्यात आलेले आहे.

सरकारचे उद्दिष्ट आहे की भविष्य निर्वाह निधीची जी काही रक्कम आहे ती ग्राहकांच्या खात्यामध्ये योग्य वेळेमध्ये आणि योग्य व्याजासह ट्रान्सफर करणे होय. यावेळी बोलताना कॅबिनेट मंत्री म्हणाले की, सन 2022 23 मध्ये एकूण भविष्य निर्वाह निधी योगदान हे 2.12 लाख कोटी रुपये असून मागच्या वर्षी ते 1.69 लाख कोटी रुपये होते.

ईपीएफओ अहवालामध्ये महत्त्वाची आकडेवारी आली समोर

सन 2022-23 या आर्थिक वर्षात ईपीएफओ चा एकूण गुंतवणूक निधी हा 21.36 लाख कोटी रुपये असून या निधीमध्ये पेन्शन आणि भविष्य निर्वाह निधी या दोन्ही रकमांचा समावेश आहे. तसेच 2021-22 या आर्थिक वर्षाचा विचार केला तर यामध्ये ही रक्कम 18.3 लाख कोटी रुपये होती.

यामध्ये जर एकूण गुंतवणुकीच्या रकमेचा विचार केला तर ती 31 मार्च 2023 रोजी 13.4 लाख कोटी रुपये होती व मागच्या वर्षी हाच आकडा अकरा लाख कोटी रुपये होता. म्हणजेच यामध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत 2.03 लाख कोटी रुपयांची भर पडली.

अशा पद्धतीने चेक करा तुमचा पीएफ खात्यातील बॅलन्स

1- एसएमएस द्वारे असा चेक करावा बॅलन्स- ईपीएफो सदस्य ज्यांचे युएएन सेवानिवृत्ती संस्थेकडे नोंदणीकृत आहेत त्यांना त्यांच्या सर्वात अलीकडील योगदानाचा तपशील आणि भविष्य निर्वाह निधी शिल्लक मेसेजच्या माध्यमातून देखील मिळवता येईल. याकरिता फक्त 7738299899 या क्रमांकावर EPFOHO UAN ENG क्या मजकुरासह संदेश पाठवायचा आहे. यामध्ये तुमच्या प्राधान्याच्या भाषेतील पहिली तीन अक्षरे दर्शवली जातात. तुम्हाला इंग्लिश निवडायचे असेल तर वरती ENG टाईप केलेले आहेत. तुम्ही मराठी किंवा हिंदीत देखील हे करू शकतात. ही सेवा दहा वेगवेगळ्या भाषांमध्ये उपलब्ध आहे. या पद्धतीमध्ये तुमची युएएन नंबर तुमचे बँक खाते तसेच आधार आणि पॅन ची लिंक करायला विसरू नका. कारण कर्मचारी भविष्य निर्वाह निधी त्यांच्या सदस्यांचे तपशील हे संग्रहित करत असते.

2- मिस कॉल सेवेद्वारे बॅलन्स कसा तपासायचा?- ईपीएफओ सदस्य 011-22901406 या क्रमांकावर मिस कॉल देऊन देखील पीएफ बॅलन्स तपासू शकतात. फक्त याकरिता तुम्हाला तुमच्या रजिस्टर फोन नंबर वरून कॉल करणे गरजेचे आहे. तुम्ही युएएन पोर्टलवर नोंदणी केली असल्यास तुम्हाला तपशील प्रदान केला जाईल.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts