स्पेशल

EPFO Update: ईपीएफओकडून नवीन महत्त्वाची मार्गदर्शक तत्त्वे जारी! करण्यात आले हे बदल, वाचा महत्त्वाची माहिती

EPFO Update:- कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओने नुकतेच कर्मचाऱ्यांच्या प्रॉव्हिडंट फंड अर्थात पीएफ खात्याबाबत काही महत्त्वाचे बदल केले असून ते ईपीएफओ सदस्यांसाठी खूप महत्त्वाचे आहेत. जसे आपल्याला माहिती आहे की, पीएफ खातेधारक अगोदर अगदी घरी बसून ऑनलाईन पद्धतीने ईपीएफओ पोर्टलच्या माध्यमातून स्वतःची वैयक्तिक माहिती मध्ये सुधारणा करू शकत होते.

याकरिता कुठेही जाण्याची गरज नव्हती. परंतु आता यामध्ये नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली असून यापुढे असे बदल घरी बसून ऑनलाईन पद्धतीने पोर्टलच्या माध्यमातून करता येणे शक्य होणार नाही.म्हणजेच तुम्ही जर ईपीएफओ चे पीएफ खातेधारक असाल व तुमच्या पीएफ खात्याची जी काही प्रोफाईल आहे

त्यामध्ये जर काही चूक झालेली असेल तर ती तुम्हाला प्रथम ईपीएफओची जी काही अधिकृत संकेतस्थळ आहे त्यावर जाऊन ती चूक दुरुस्त करता येणे शक्य होते. परंतु आता नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्यानंतर खातेदारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. तुम्हाला फक्त आता तुमच्या प्रोफाईल मधील काही निवडक बदल तुम्ही करू शकणार आहात.

 करण्यात आले हे बदल

तुम्हाला आता तुमच्या पीएफ खात्याची जी काही प्रोफाइल आहे त्यामध्ये तुमच्या नावात बदल करता येणे शक्य होणार नाही.  कारण बऱ्याचदा काही व्यक्ती त्यांच्या नावामध्ये स्पेलिंग चुकवून टाकतात व त्यामुळे नावात चूक झाल्याने पीएफ खात्यात अनेकदा समस्या निर्माण होतात. अगोदर ही समस्या ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून सोडवता येत होती परंतु ती आता या मार्गदर्शक सूचना नंतर पोर्टलच्या माध्यमातून सोडवता येणार नाही.

याकरिता आता संबंधित व्यक्तीला थेट आवश्यक कागदपत्र सोबत घेऊन कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या ऑफिसमध्ये जावे लागणार आहे. तसेच बऱ्याचदा ईपीएफओ प्रोफाईल मध्ये जन्मतारीख, वडिलांचे नाव तसेच नॉमिनीचे नाव आणि तुमच्या मालकाचे नाव देखील आता बदलू शकणार नाही. याकरिता देखील तुम्हाला आता आवश्यक कागदपत्र सोबत घेऊन कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या कार्यालयात जाणे गरजेचे आहे.

 फक्त हे बदल करता येतील

ईपीएफओच्या नवीन मार्गदर्शक सूचनानुसार आता तुम्हाला फक्त तुमचे आडनाव बदलता येणार आहे. कारण लग्नानंतर अनेक महिलांचे आडनाव बदलत असल्याने ईपीएफओने ही सुविधा दिली आहे. परंतु ही सुविधा देखील तेव्हा शक्य होणार आहे जेव्हा तुम्ही तुमच्या आधार कार्डमध्ये तुमचे नवीन नाव अपडेट केलेले असेल.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts