EPFO Rule:- कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओ आणि खाजगी व सरकारी क्षेत्रातील काम करणारे कर्मचारी यांचा घनिष्ठ संबंध असून कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्याचे नियमन व त्यासंबंधीचे नियम हे प्रामुख्याने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या माध्यमातून केले जातात हे आपल्याला माहिती आहे.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना EPFO खातेधारकांसाठी अनेक प्रकारचे नियम करत असते व हे नियम कर्मचारी व त्यांचे पीएफ खाते यांच्याकरिता लागू होत असतात.
त्या अनुषंगाने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने ईपीएफओ सदस्यांसाठी एक महत्त्वाची बातमी दिली असून ईपीएफओच्या माध्यमातून आता ईपीएफओ खातेधारकांना सरकारच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला साडेसात हजार रुपये दिले जाणार आहेत व हे साडेसात हजार रुपये विशिष्ट अटी पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.
ईपीएफओ किंवा सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेली ही घोषणा नक्कीच खाजगी क्षेत्रात नोकरी करणाऱ्यांसाठी वरदान ठरेल हे मात्र निश्चित.
ईपीएफओ या कर्मचाऱ्यांना देणार 7500?
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना काही ठराविक अटी पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यामध्ये प्रत्येक महिन्याला 7500 जमा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. यासंबंधीचा जर आपण ईपीएफओचा नियम बघितला तर कर्मचाऱ्यांना यामध्ये 23 वर्षाचे सेवा बजावणे यामध्ये बंधनकारक आहे.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कडून दिली जाणारी ही रक्कम स्वतंत्रपणे दिली जाणार नसून ती पीएफ खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. ही रक्कम कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यामध्ये पेन्शन रक्कम म्हणून जमा केली जाईल हे या मध्ये लक्षात घेण्यासारखे आहे.
पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम केव्हा काढता येते?
यामध्य कर्मचाऱ्यांनी कमीत कमी दहा वर्षे नोकरी केली असेल किंवा ज्यांनी वयाची 58 वर्षे पूर्ण केले असतील अशा कर्मचाऱ्यांना पेन्शन काढता येते आपल्याला माहिती आहे. या अगोदर ईपीएफओच्या माध्यमातून म्हणजेच पीएफ खात्यातून काही नियमानुसार पैसे काढले जाऊ शकत होते.
परंतु आता पैसे काढण्याच्या नियमांमध्ये बदल केले जात असून आता लवकरच लोकांना हवे तितके पैसे खात्यातून काढता येणार आहेत. या बाबतीत जर आपण सध्याचा नियम बघितला तर कर्मचारी त्याची संपूर्ण पीएफची रक्कम फक्त दोन कारणांसाठी काढू शकतो व त्यातील प्रमुख कारण म्हणजे लग्न आणि दुसरे म्हणजे घराचे बांधकाम याकरिता होय. कर्मचाऱ्यांना त्यांच्या पीएफ खात्यातून ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही माध्यमातून रक्कम काढता येते.
पीएफ खात्यातील बॅलन्स कसा चेक कराल?
तुम्हाला जर तुमच्या पीएफ खात्यातील शिल्लक रक्कम तपासायची असेल तर तुम्ही ते सहजपणे तपासू शकतात. समजा तुम्हाला जर पीएफ खात्यातील शिल्लक तपासायची असेल तर तुम्ही एसएमएसच्या माध्यमातून जाणून घेऊ शकतात.
याकरिता तुम्हाला 7738299899 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल व त्यानंतर तुम्ही तुमच्या ईपीएफ खात्यातील शिल्लक आणि तुमच्या खात्यातील कॉन्ट्रीब्युशन म्हणजेच तुमचे योगदान देखील तपासू शकतात. याकरिता तुम्हाला तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वरून AN EPFOHO ENG टाईप करून मेसेज पाठवावा लागेल.