Farmer Daughter Became Air Force flight commander : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची मुलं आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर साता समुद्रा पार आपल्या नावाचा आणि आपल्या महाराष्ट्राचा डंका वाजवत आहेत. असंच एक उत्तम उदाहरण अमेरिकेतून समोर येत आहे. खरं पाहता, नांदेड जिल्ह्यातील रेवा दिलीप जोगदंड या शेतकऱ्याच्या लेकीने अमेरिकेत एअर फोर्स फ्लाईट कमांडर हे पद पटकवलं आहे.
यामुळे सध्या रेवाची संपूर्ण देशभरात चांगलीच चर्चा रंगली आहे. एका मराठमोळ्या शेतकरी कन्येने मिळवलेलं हे नेत्र दीपक यश निश्चितच महाराष्ट्राची मान गर्वाने उंचावत आहे. यामुळे महाराष्ट्राच्या शिरेपेच्यात मानाचा तुरा रोवला गेला आहे. शेतकऱ्याच्या लेकीने आपल्या परिवाराचे, आपले व महाराष्ट्राचे नाव सातासमुद्रापार गाजवल आहे.
यामुळे सध्या रेवा यांच्यावर सर्वत्र कौतुकांचा वर्षाव होत आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील कोंढा येथील केशवराव बालाजी जोगदंड यांचे सुपुत्र दिलीप यांनी 22 वर्षांपूर्वी अमेरिका गाठले आणि तेथे स्थायिक झाले. याच दिलीप केशवराव जोगदंडे यांची मुलगी रेवा हिने अमेरिकेत एअर फोर्स फ्लाईट कमांडर पदाला गवसणी घातली आहे.
खरं पाहता दिलीपराव अमेरिकेत स्टरिंग कंट्रोल दोरीवर विमान उडविणे यावर संशोधन करण्यासाठी गेले होते. ते संशोधन यशस्वी झाले आणि त्यातूनच मग प्रेरणा घेत रेवाने पायलट बनण्याचे स्वप्न पाहिलं. आज शेवटी रेवा यांची स्वप्नपूर्ती झाली आहे. ती आज अमेरिकेत एअर फोर्स फ्लाईट कमांडर बनली असून यामुळे भारतीयांची मान देखील उंचावली आहे. रेवा आपल्या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी गेल्या दोन वर्षांपासून कठोर मेहनत घेत होती.
विशेष बाब म्हणजे या पदाच्या परीक्षेसाठी एकूण 500 विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. या पाचशे विद्यार्थ्यांपैकी मात्र 26 उमेदवार सिलेक्ट करण्यात आले. निश्चितच या परीक्षेची काठीण्य पातळी अधिक होती. मानाचे पद मिळणार असल्याने काठिण्य पातळी अधिक राहणं साहजिकच.
मात्र रेवा यांनी यासाठी अहोरात्र आणि अथक परिश्रम घेतले असल्याने अंतिम 26 मध्ये आपलं नाव कोरल आणि अमेरिकेत एअर फोर्स फ्लाईट कमांडर बनण्याचं आपलं लहानपणीच स्वप्न सत्यात उतरवलं.
निश्चितच रेवा यांचे हे यश त्यांच्यासाठी महत्त्वाचे तर आहेच शिवाय यामुळे पुन्हा एकदा भारतीयांचे कर्तुत्व जगापुढे मांडण्याचं काम झालं असल्याने भारतासाठी देखील ही एक अभिमानास्पद बाब आहे. शेतकऱ्याच्या लेकी आता कोणत्याच क्षेत्रात मागे राहिलेले नाहीत हे रेवा यांच्या या यशातून जगजाहीर झाल आहे.