स्पेशल

दिलासादायक ! महिला शेतकऱ्यांच्या अपघाती मृत्यूनंतर वारसाला मिळणार ‘इतक्या’ लाखांचे अनुदान; योजनेचे स्वरूप, पात्रता, कागदपत्राविषयी वाचा….

Farmer Scheme : राज्य शासनाने राज्यातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. यामधील काही योजनेत बदल करण्यात आले आहेत. नुकतेच गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत देखील बदल करण्यात आला आहे.

आता शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास गोपीनाथ मुंडे शेतकरी सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत थेट शासनाकडून अनुदान मिळणार आहे. विशेष म्हणजे या योजनेत बदल करण्यात आला आहे.

आता शेतकरी महिलेचा बाळंतपणात मृत्यू झाला तरी अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच पूर्वी विमा कंपनीच्या माध्यमातून ही योजना राबवली जात होती मात्र आता प्रस्ताव मंजुरीचे अधिकार तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील समितीला देण्यात आले आहेत.

यामुळे आता अपघात झाल्यानंतर वारसदारांना तीन दिवसाच्या आत अनुदानासाठी तालुका कृषी अधिकार्‍याकडे प्रस्ताव पाठवणे अनिवार्य आहे. विशेष म्हणजे प्रस्ताव सादर झाल्यानंतर याची पडताळणी आणि डीबीटीच्या माध्यमातून मदत वाटपाची कार्यवाही तालुकास्तरावरील समितीच करणार आहे.

हे पण वाचा :- विविध शेती कामे करण्यासाठी ‘हा’ ट्रॅक्टर ठरणार वरदान ! किंमतही आहे परवडणारी, वाचा….

किती मदत मिळणार

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, गोपीनाथ मुंडे शेतकरी सानुग्रह अनुदान योजना अंतर्गत अपघाती मृत्यू तसेच अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन अवयव किंवा एक डोळा, एक अवयव कायमस्वरूपी निकामी झाल्यास 2 लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे. तसेच अपघातामुळे एक डोळा अथवा एक अवयव कायमस्वरूपी निकामी झाल्यास 1 लाख रुपये अनुदान देण्याचे प्रावधान यामध्ये करून देण्यात आले आहे.

हे अपघात झाले तर मिळणार अनुदान

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अपघात झाल्यास त्यांच्या वारसांना अनुदान मिळणार आहे. यात रस्ता रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, कीटकनाशके हाताळताना, विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात, वीज पडून मृत्यू, उंचावरून पडून झालेला अपघात, सर्प/विंचू दंश, नक्षलवाद्याकडून झालेली हत्या, जनावरांच्या हल्ल्यामुळे/ चावण्यामुळे जखमी मृत्यू, दंगल, अन्य कोणतेही अपघात तसेच अपघाताच्या व्याख्येनुसार कोणत्याही अनपेक्षित आकस्मिक दुर्दैवी अपघातामुळे होणारे मृत्यू या अपघातांचा समावेश करण्यात आला आहे.

तसेच आता महिला शेतकऱ्यांचा जर बाळंतपणात मृत्यू झाला तरीही या योजनेअंतर्गत अनुदान मिळणार आहे. निश्चितच बाळांतपणात महिला शेतकऱ्यांचा मृत्यू झाला तर त्यांच्या वारसांना या योजनेअंतर्गत दोन लाखांपर्यंतचे अनुदान मिळणार असल्याने अशा शेतकरी कुटुंबाला यामुळे दिलासा मिळणार आहे.

हे पण वाचा :- पंजाब डख सुधारित मान्सून अंदाज 2023 : 3 जून पासून मुसळधार पावसाला सुरुवात होणार ; महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात कोसळणार धो-धो पाऊस !

लाभासाठी आवश्यक कागदपत्रे

या योजनेअंतर्गत मदतीचा प्रस्ताव तीस दिवसात अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना सादर करावा लागतो. यासाठी काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. यामध्ये ७/१२ उतारा, मृत्यूचा दाखला, शेतकऱ्यांचे वारस म्हणून गाव कामगार तलाठ्याकडील गाव नमुना सहा (क) नुसार मंजूर झालेली वारसाची नोंद, शेतकऱ्यांच्या वयाच्या पडताळणीसाठी त्याचा शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र अशी वयाची खात्री होणारी कागदपत्रे, प्रथम माहिती अहवाल (एफआयआर), स्थळ पंचनामा, पोलीस पाटील माहिती अहवाल इत्यादी कागदपत्र सादर करावी लागतात.

हे पण वाचा :- तरुणांसाठी आनंदाची बातमी ! तलाठी भरती निघाली; 4625 रिक्त तलाठ्यांची पदे भरली जाणार, केव्हा होणार परीक्षा? वाचा….

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts