स्पेशल

मानलं रामचंद्र बुवा ! 20 गुंठ्यात मिरचीच्या पिकातून कमवलेत 7 लाख, परिसरात रंगली एकच चर्चा

Farmer Success Story : महाराष्ट्रातील शेतकरी बांधव कायमच वेगवेगळ्या प्रयोगाच्या माध्यमातून चर्चेत बनलेले असतात. पारंपारिक पीकपद्धतीला बगल देत आता शेतकरी नवनवीन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नगदी पिकांची शेती करू लागले आहेत. यामध्ये भाजीपाला वर्गीय पिकांचीं प्रामुख्याने शेती होत आहे. याशिवाय हंगामी पिकांची देखील मोठ्या प्रमाणात राज्यात शेती पाहायला मिळत आहे.

विशेष बाब अशी की शेतीमध्ये प्रामुख्याने पीक पद्धतीत केलेला हा बदल शेतकऱ्यांसाठी फायद्याचा ठरत आहे. दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील एका प्रयोगशील शेतकऱ्याने देखील कमी शेत जमिनीतून अधिक उत्पादन मिळवण्याच्या हेतूने मिरची आणि कलिंगड या हंगामी पिकांच्या शेतीतून लाखो रुपयांची कमाई करून दाखवली आहे.

त्यामुळे सध्या या प्रयोगशील शेतकऱ्याची मोठी चर्चा रंगत आहे. रामचंद्र चोपडे असे या शेतकऱ्यांचे नाव असून त्यांनी आपल्या वीस गुंठे शेतजमीनीत कलिंगड आणि मिरची या पिकाची शेती करून तब्बल सात लाखांची कमाई केली आहे. खरं पाहता रामचंद्र कायमच शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करत असतात. याच प्रयोगाच्या माध्यमातून त्यांनी मिश्र शेती करण्याचा निर्णय घेतला. मिश्र शेतीसाठी त्यांनी कलिंगड आणि मिरची या दोन पिकांची निवड केली.

विशेष बाब अशी की रामचंद्र पिंपळनेर येथील विठ्ठल राव शिंदे सहकारी साखर कारखान्यात नोकरीवर आहेत. मात्र नोकरीवर असतानाही त्यांनी शेतीमध्ये केलेली ही कामगिरी इतरांसाठी प्रेरक ठरत आहे. रामचंद्र यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे वडिलोपार्जित केवळ चार एकर शेत जमीन आहे. अल्पभूधारक शेतकरी असल्याने कमी शेत जमिनीत अधिक उत्पादन अन उत्पन्न कोणत्या पिकातून मिळेल यासाठी ते कायमच प्रयोग करत असतात.

असाच प्रयोग करत त्यांनी आपल्या वीस गुंठे शेत जमिनीत कलिंगड आणि मिरचीची लागवड केली. यासाठी त्यांना जवळपास 70 हजाराचा खर्च आला. लागवड केल्यानंतर कलिंगड आणि मिरची पिकावर रोगाचे सावट आले. अशा परिस्थितीत त्यांनी तज्ञांचे मार्गदर्शन घेत योग्य औषधांची संतुलित प्रमाणात फवारणी केली. यामुळे त्यांचे पीक चांगले बहरले आणि त्यांना दर्जेदार उत्पादन देखील मिळाले.

रामचंद्र यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना या वीस गुंठे शेत जमिनीतून सात लाखांची कमाई झाली. खर्च वजा जाता सहा लाख तीस हजाराचा निव्वळ नफा त्यांना या पिकातून राहिला. निश्चितच रामचंद्र यांनी शेतीमध्ये केलेला हा प्रयोग इतरांसाठी प्रेरक राहणार असून काळाच्या ओघात आणि आवश्यकतेनुसार शेतीमध्ये बदल करणे आता गरजेचे असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे.

मराठमोळ्या शेतकऱ्याचा नादखुळा ! 2 एकरात ‘या’ फुलाचीं केली लागवड, आता कमवतोय महिन्याकाठी 1 लाख, पहा ही भन्नाट यशोगाथा

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts