Farmer Success Story : शेतीमध्ये गेल्या काही वर्षापासून शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. आसमानी आणि सुलतानी संकटांमुळे बळीराजा भरडला जात आहे. अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट यांसारख्या नानाविध नैसर्गिक संकटांमुळे शेतकऱ्यांना शेतीमधून अपेक्षित असे उत्पादन मिळत नाही. शिवाय उत्पादित केलेल्या शेतमालाला बाजारात चांगला दर मिळत नाही.
परिणामी शेती व्यवसाय शेतकऱ्यांसाठी तोट्याचा सिद्ध होत आहे. या परिस्थितीपायी बहुतांशी नवयुवकांनी आता शेतीला रामराम ठोकत आपला नवीन व्यवसाय थाटला आहे. काही तरुणांनी आता शेती ऐवजी नोकरीच बरी असं म्हणतं शहराकडे आपला मोर्चा वळवला असून शहरातच आता स्थायिक झाले आहेत.
हे पण वाचा :- मुंबई ते नागपूरचा प्रवास होणार आणखी जलद ! सुरु होणार नवीन सुपरफास्ट ट्रेन; केव्हा सुरु होणार, ट्रेनला कुठ राहतील थांबे, पहा……
या अशा परिस्थितीमध्ये मात्र परभणी जिल्ह्यातील एका नवयुवक तरुणाने शेती ही देखील फायदेशीर ठरू शकते हे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. त्यामुळे सध्या या नवयुवक तरुणाची परिसरात चर्चा आहे. जिल्ह्याच्या गंगाखेड तालुक्याच्या मौजे सुनेगाव येथील वैभव सूर्यवंशी या तरुण शेतकऱ्याने इतर तरुणांप्रमाणे नोकरीमध्ये राम शोधण्याऐवजी शेतीमध्येच घाम गाळला आहे.
आता या तरुणाला या घामाचे फळ देखील मिळाले आहे. वैभव यांनी आपल्या दोन एकरात खरबूज या पिकाची लागवड केली. लागवडीनंतर योग्य नियोजन आणि आधुनिक पद्धतीने पीक व्यवस्थापन केले. खत आणि औषधांची मात्रा संतुलित प्रमाणात त्यांनी दिली. यामुळे खरबूज पिकाचे चांगले दर्जेदार उत्पादन मिळाले आहे.
आता गेल्या महिन्याभरापासून या पिकातून त्यांना उत्पादन मिळत असून 175 क्विंटल पर्यंतचा माल आतापर्यंत काढणी झाला आहे. विशेष म्हणजे उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर बाजारात खरबूज या पिकाला मोठी मागणी आहे. तसेच येत्या काही दिवसात आणखी मागणी वधारण्याची शक्यता आहे.
वैभव यांनी दिलेल्या माहितीनुसार वीस रुपये प्रति किलो असा त्यांच्या मालाला भाव मिळत असून यातून त्यांना जवळपास साडेतीन लाख रुपयांची कमाई झाली आहे. निश्चितच वैभव यांनी अल्पकालावधीत आणि कमी जमिनीत खरबूज या पिकाच्या शेतीतून लाखो रुपयांची कमाई करत इतरांसाठी मार्गदर्शक असं काम केलं आहे.
हे पण वाचा :- गुंतवणूकदारांसाठी ‘हा’ स्टॉक ठरला कुबेर का खजाना ! फक्त 6 महिन्यात 2 लाखाचे बनवलेत 30 लाख, पहा….