स्पेशल

सातवी पास तरुणाच्या जिद्दीची कहाणी ! घरी होतं अठराविश्व दारिद्र्य पण खचला नाही; आता ‘या’ पिकाच्या शेतीतून बनला थेट कोट्याधीश, वाचा सविस्तर

Farmer Success Story : महाराष्ट्र ही संत-महात्म्याची भूमी म्हणून जगात ख्याती प्राप्त आहे. अशा या महान राष्ट्राच्या भूमीतील तरुणही अलीकडे वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवत आहेत. शेती क्षेत्रात देखील राज्यातील तरुण पिछाडीवर नाहीत. वेगवेगळ्या प्रयोगाच्या माध्यमातून शेतीतूनही आता राज्यातील तरुणांनी आपला कार्याचा जागर देशपातळीवर नेऊन ठेवला आहे.

विशेष बाब म्हणजे राज्यातील तरुण शेतकऱ्यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील अभूतपूर्व अस यश मिळवलं आहे. जालना जिल्ह्यातील एका तरुण शेतकऱ्याने देखील असंच काहीसं केलं आहे. घरी अठराविश्व दारिद्र्य, दोनदा जेवणाची देखील सोय होत नव्हती, आता जेवणाचीच सोय होत नव्हती म्हटल्यावर शिक्षणही जेमतेम सातवीपर्यंतच. मात्र जिद्द साऱ्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी परिपूर्ण होती.

आर्थिक परिस्थिती बेताची असली तरी देखील इच्छाशक्ती मात्र या तरुणांमध्ये अपार होती. याच इच्छाशक्तीच्या आणि जिद्दीच्या जोरावर या तरुणाने शेती व्यवसायात अशी काही मजल मारली आहे की तो आता थेट कोट्याधीश बनला आहे. गंगाधर कुबरे असे या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. जिल्ह्यातील चितळी पुतळी या गावातील हा तरुण रहिवासी असून याच गावात त्याची शेती आहे. खरं पाहता एकेकाळी या कुबरे कुटुंबाला खाण्यासाठी देखील पुरेसं मिळत नव्हतं, उदरनिर्वाहाचाच प्रश्न ऐरणीवर होता. परिणामी या कुटुंबाने मुंबईत रोजगारानिमित्ताने स्थलांतर केले.

असं म्हणतात की मायानगरी मुंबई सर्वांच्या स्वप्नाला जागी होते. आणि म्हणूनच मुंबईला स्वप्ननगरी देखील म्हणतात. स्वप्ननगरीमध्ये मात्र या तरुणाने काबाडकष्ट करून आर्थिक स्थैर्यता आणली. यानंतर मग गंगाधर यांनी 2017 मध्ये गावी असलेल्या शेतीमध्ये प्रयोग करण्याच ठरवलं. या पार्श्वभूमीवर त्यांनी 300 चंदनाची रोपे आणली. एका एकरात या चंदनाची लागवड करण्यात आली. सुरुवातीला आईचा या चंदन शेतीसाठी मात्र विरोध होता. पण आईला गंगाधर यांनी समज देत चंदन शेतीचे फायदे सांगितले.

यानंतर या रोपांची लागवड झाली आणि जवळपास पाच वर्ष त्यांच्या आईने या रोपाची गावी राहून जोपासना केली. चंदन लागवडीसाठी कुबरे यांना जवळपास साडेतीन लाख रुपयांचा खर्च आला. यामध्ये बोरवेल आणि पाईपलाईन साठी तीन लाख आणि रोपांसाठी साठ हजार अशा खर्चाचा समावेश होता. रोपं लागवडीनंतर या चंदनाच्या शेतीमध्ये आंतरपीक म्हणून वेगवेगळ्या पारंपारिक पिकांची लागवड देखील करण्यात आली. गंगाधर कुबरे स्वतः दर आठवड्याला मुंबईवरून येऊन चंदनाच्या बागेची काळजी घेत.

चार वर्षे यामध्ये आंतरपीक घेतली गेली आहेत. यातून यांना चांगले उत्पन्न देखील मिळाले आहे.

चंदन परजीवी असल्याने यामध्ये कडुलिंबाचे देखील झाडे त्यांनी लावले आहेत. दरम्यान आता 2021 पासून मुंबईमध्ये असलेले त्यांचे गॅरेज मोठ्या भावाकडे सोपवून गंगाधर गावी चंदन शेती करण्यासाठी परत आले आहेत. विशेष बाब म्हणजे मूळची मुंबई कर असलेली त्यांची धर्मपत्नी देखील त्यांना शेती व्यवसायात मोलाची साथ देत आहे. एका एकरात लावलेल्या या 300 झाडांपासून त्यांना जवळपास तीन कोटी रुपयांची कमाई होण्याची आशा आहे.चंदन शेतीच्या या परियोगासोबतच ते सोयाबीन कापूस यांसारख्या पारंपारिक पिकांची देखील शेती करत आहेत.

निश्चितच, परिस्थिती कितीही खडतर असली तरी मराठी तरुण आपल्या जिद्दीच्या जोरावर कायमच परिस्थितीवर मात करत यशस्वी ठरला आहे. गंगाधर हे देखील याचेच एक उत्तम उदाहरण आहेत. निश्चितच गंगाधर कुबरे यांनी शेतीमध्ये केलेला हा प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी देखील मार्गदर्शक राहणार आहे. शिक्षण मात्र सातवीपर्यंत झालेल, घरी हालाखीची परिस्थिती तरीही न डगमगता मिळवलेलं हे यश निश्चितच इतर यशाच्या तुलनेत कौतुकास्पद असून यामुळे इतरांना प्रेरणा मिळेल यात तीळ मात्र देखील शंका नाही.

Ajay Patil

Published by
Ajay Patil