स्पेशल

धक्कादायक ! शेतकरी आत्महत्येचा फास झाला घट्ट ; मराठवाड्यातील ‘इतक्या’ शेतकऱ्यांनी संपवलं जीवन, ‘ही’ नवीन आकडेवारी वाचून बसेल धक्का

Farmer Suicide : भारत हा कृषीप्रधान देश आहे मात्र या कृषीप्रधान देशात शेतकरी आत्महत्या दिवसेंदिवस वाढत आहेत. विशेषता महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्येचा आकडा काळीज पिळवटणारा आहे. आपल्या गौरवमय इतिहासासाठी ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रावर शेतकरी आत्महत्येमुळे एक मोठा कलंक लागला आहे. महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण हे सर्वाधिक पाहायला मिळते.

सातत्याने येणारी नापिकी आणि त्यामुळे वाढणार कर्ज यामुळे जगाचा पोट भरणारा बळीराजा फासावर लटकत असल्याचे विदारक दृश्य गेल्या कित्येक वर्षांपासून पाहायला मिळत आहे. दरम्यान आता मराठवाड्यातून एक मोठी हृदयविदारक अशी आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीमुळे आपण नेमकं कृषीप्रधान देशातच राहत आहोत ना याबाबत शंका येत आहे.

हाती आलेल्या नवीनतम आकडेवारीनुसार 2022 यावर्षी तब्बल 1023 शेतकरी बांधवांनी आपल्या जीवनाची यात्रा संपवली आहे. हा आकडा 2021 या वर्षापेक्षा वाढला आहे. म्हणजेच शेतकरी आत्महत्येवर शासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत का? हा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित झाला आहे. राज्य शासनाकडून शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी योग्य आणि कारकर असे उपाय करण्याची गरज आता प्रकर्षाने जाणवू लागली आहे.

मराठवाड्यात गेल्या काही वर्षांपासून होत असलेल्या शेतकरी आत्महत्येच्या आकडेवारीवर जर नजर टाकली तर शासनाकडून होणाऱ्या या घोषणा, राबवल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या योजना, दिली जाणारी कर्जमाफी, पोखरा अंतर्गत दिल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या बाबींसाठी अनुदान, रोहयोअंतर्गत राबवल्या जाणाऱ्या योजना या केवळ कागदावरच आहेत की काय असा प्रश्न उपस्थित होतो.

यामुळे शासनाकडून शेतकऱ्यांसाठी ज्या योजना सुरू करण्यात येतात त्या गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत आहेत का? याची देखील खातरजमा शासनाने केली पाहिजे. दरम्यान २०१९ मध्ये मराठवाड्यात शेतकरी आत्महत्येचा आकडा ७६० च्या आत होता. त्यानंतर २०२० मध्ये ७७३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. तर २०२१ मध्ये तब्बल ८८७ जणांनी मृत्यूला कवटाळले होते, म्हणजेच दरवर्षी हा आकडा वाढतच आहे.

दरम्यान आता 2022 मध्ये एक हजाराच्या आत असणारी ही आकडेवारी 1000 क्रॉस झाली आहे. यामुळे नेमकं शासन कोणत्या उपाययोजना शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी करत आहे हा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. जाणकार लोकांच्या मते यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना अतिशय कवडीमोल उत्पन्न मिळालं अशातच लंपी आजारामुळे पोटच्या लेखाप्रमाणे सांभाळलेलं पशुधन देखील मरणाच्या दारात गेलं त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक आणि मानसिक असा मोठा धक्का बसला.

एकीकडे कवडीमोल उत्पन्न मिळाले असल्याने कर्जाची परतफेड कशी करायची तसेच दावणीला बांधलेलं हजारो, लाखो रुपयांचे पशुधन या महाभयंकर आजारात दगावले असल्याने शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलत आपल्या जीवनाची यात्रा संपवल्याचे सांगितले जात आहे.

निश्चितचं मराठवाड्यात वाढणारी शेतकरी आत्महत्या ही एक चिंतेची बाब असूनही यासाठी सत्ताधारी, पक्ष, विपक्ष, समाजकारण, राजकारण, अर्थकारण इत्यादी क्षेत्रातील तज्ञ लोकांनी येऊन काहीतरी उपाय शोधणे एक आवश्यक बाब बनली आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts