Krushi News: शेतीला (Farming) चालना देण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात (Farmers Income) भरीव वाढ करण्यासाठी शासनाद्वारे कायम शेतकरी हिताच्या योजना (Farmers Scheme) राबविल्या जात असतात.
या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा मायबाप शासनाचा (Government) मानस असतो. मित्रांनो खरे पाहता आपल्या देशाची ग्रामीण अर्थव्यवस्था हे शेती व शेतीपूरक व्यवसायावर सर्वस्वी अवलंबून आहे.
यामुळे मायबाप शासन शेतकऱ्यांच्या भल्यासाठी शेती व शेतीपूरक व्यवसायांना चालना देण्यासाठी अनेक योजना राष्ट्रीय स्तरावर कार्यान्वित करून शेतकऱ्यांना लाभ देण्याचा कायमच प्रयत्न करत असते. मोदी सरकारने या यादीत एक उत्पादन एक जिल्हा (One product one district) ही नाविन्यपूर्ण योजना सुरू केली आहे.
या योजनेच्या माध्यमातून देशातील शेतकरी बांधव माय-बाप शासनाच्या आर्थिक सहाय्याने सहजरीत्या कृषी प्रक्रिया उद्योग (Agro processing industry) उभारू शकतात आणि चांगले उत्पन्न कमवून आर्थिक सुबत्ता प्राप्त करू शकतात.
मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी शेतकऱ्यांना सरकारकडून आर्थिक मदत केली जात आहे. पंतप्रधान औपचारिक सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग (Prime Minister formal micro food processing industry)
योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार तसेच आपले राज्य सरकार कृषी प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी अनुदान देत असते. या योजनेत केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्हीकडून मदत दिली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी लाभ मिळतं असल्याचा दावा केला जातो.
कसं आहे योजनेचे स्वरूप
ही केंद्र सरकारद्वारे सुरु करण्यात आलेली आणि केंद्र-राज्य दोघकडून चालवली जाणारी योजना आहे.
केंद्राचा 60 टक्के निधी तसेच राज्याचा 40 टक्के निधी या योजनेच्या माध्यमातून संबंधित शेतकऱ्यांना प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी दिला जातो.
या योजनेच्या माध्यमातून एक जिल्हा एक उत्पादन नुसार संबंधित जिल्ह्यात त्या उत्पादनावर प्रक्रिया करण्यासाठी उभारण्यात आलेल्या उद्योगास अनुदान दिले जाणार आहे.
मित्रांनो राज्यातील मुंबई उपनगर व मुंबई शहर समवेतच संपूर्ण जिल्ह्यात ही योजना लागू करण्यात आली आहे.
या योजनेचा लाभ वैयक्तिक लाभार्थी, शेतकरी उत्पादक संघटना, भागीदारी संस्था, स्वयंसहायता गट इत्यादी लोकांना देण्यात येतो.
या योजनेच्या माध्यमातून एकूण खर्चाच्या 35 टक्के किंवा जास्तीत जास्त 10 लाखांचे अनुदान संबंधितांना देण्यात येते.
निश्चितच केंद्र सरकार पुरस्कृत ही योजना शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरु करण्यात आलेली एक कल्याणकारी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून अन्नप्रक्रिया उद्योगाला मोठी उभारी मिळणार असल्याचा तज्ज्ञांचा दावा आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भरीव वाढ होणार यात तिळमात्र देखील शँका नाही.