स्पेशल

नितीन गडकरींचा बळीराजाला सल्ला ! शेतकऱ्यांनो, एकरी 200 टन उत्पादन, उसासारखा भाव असलेल्या ‘या’ पिकाची लागवड करा

Farming News : नितीन गडकरी हे भाजपाचे फायर ब्रँड नेते म्हणून देशात तसेच संपूर्ण जगात ख्याती प्राप्त आहेत. नितीन गडकरी आपल्या कामासाठी विशेष ओळखले जातात. त्यांच्या कामाची छाप अशी आहे की विरोधक देखील त्यांचे मुरीद बनले आहेत.

विरोधकांना देखील त्यांच्या कामाची भुरळ पडली आहे. आपल्या कामासोबतच नितीन गडकरी आपल्या भाषणासाठी देखील विशेष ओळखले जातात. ते आपल्या भाषणातून तरुणाईला, शेतकऱ्यांना, महिलांना नेहमीच मोटिवेट करण्याचा प्रयत्न करतात.

युवकांना तसेच शेतकऱ्यांना मोलाचा सल्ला देखील ते देतात. दरम्यान औरंगाबाद येथील पैठण येथे आयोजित एका कार्यक्रमादरम्यान नितीन गडकरी यांनी शेतकऱ्यांना असाच एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. 

हे पण वाचा :- देशातील समुद्राखालील पहिला बोगदा महाराष्ट्रात; ‘इतक्या’ वर्षात काम होणार पूर्ण, 21 किलोमीटर लांबी, 6397 कोटींचा खर्च, कसा राहणार रूटमॅप

या कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी शेतकऱ्यांना एकरी 200 टन उत्पादन आणि उसासारखा भाव असलेल्या पिकाची लागवड करण्याचा सल्ला दिला आहे. गडकरी यांनी शेतकऱ्यांना बांबू लागवड करण्याची शिफारस केली आहे.

गडकरी यांनी आपल्या भाषणात म्हटले की, बांबू इकॉनोमी ही देशासाठी गरजेचे असून देशात आता रस्त्यांच्या बाजूला बांबूच्या बॅरेकेडिंग लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

यामुळे शेतकऱ्यांनी बांबूचे उत्पादन घ्यावे. यापासून त्यांना दोनशे टन प्रति एकर उत्पादन मिळेल. बांबू सर्वात जास्त कार्बनडाय ऑक्साईड सोसून घेतो. वीज निर्मितीसाठी कोळशाऐवजी बांबूचा वापर करता येतो. 

हे पण वाचा :- मराठमोळ्या शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग! ‘या’ पद्धतीने गुलाब फुल शेती सुरु केली, वर्षभरात झाली लाखो रुपयांची कमाई, वाचा ही यशोगाथा

यामुळे स्वस्तात वीजनिर्मिती होईल, देशाचे 16 लाख कोटी रुपये वाचून ते शेतकऱ्यांना मिळाले तर शेतकरी अन्नदाता व ऊर्जादाता बनेल. साहजिकच यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडणार आहे. म्हणून शेतकऱ्यांनी बांबू लागवड करावी, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे.

खरतर बांबूची लागवड आपल्या देशात होत नाही असे नव्हे तर बांबूचे क्षेत्र इतर पिकांच्या तुलनेत आपल्याकडे खूपच कमी आहे. शेतकरी बांबू लागवडीला अजूनही अपेक्षित असा प्रतिसाद दाखवत नाहीत.

यामुळे शासनाकडून शेतकऱ्यांनी बांबूची शेती करावी यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. अशातच आता केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री गडकरी यांनी देखील शेतकऱ्यांना बांबू लागवड करण्याचा सल्ला दिला आहे.

हे पण वाचा :- बीआरएसचा मोठा निर्णय ! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा कांदा ‘इतक्या’ विक्रमी भावात तेलंगणात विक्री करणार, वाचा….

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts