FD News : एफडी ही एक सुरक्षित गुंतवणूक योजना म्हणून ओळखली जाते. भारतीय लोक परताव्यापेक्षा सुरक्षिततेला अधिक प्राधान्य देतात. यामुळे कोणत्याही योजनेत गुंतवणूक करण्याआधी ती योजना कितपत सुरक्षित आहे याची चाचपणी प्रत्येक जण करतो. हेच कारण आहे की आजही भारतात फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे.
अलीकडील काही वर्षांमध्ये शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे यात शंकाच नाही. पण, गेल्या काही वर्षांमध्ये देशातील राष्ट्रीयकृत बँकांनी आणि छोट्या स्मॉल फायनान्स बँकांनी देखील गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी एफ डी व्याजदरात चांगली वाढ घडवून आणली आहे.
यामुळे एफडी करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. अलीकडे महिला वर्ग देखील एफडीकडे आकर्षित होत असून मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करण्यात महिलांचे प्रमाण देखील विशेष उल्लेखनीय आहे. दरम्यान जर तुम्हीही आगामी काळात फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल आणि तुमचे लग्न झाले असेल तर ही बातमी तुमच्यासाठी फारच महत्वाची ठरणार आहे.
फिक्स डिपॉझिट मधून अधिकचा फायदा मिळवायचा असेल तर बायकोच्या नावाने गुंतवणूक करा
जर तुमचे लग्न झाले असेल आणि तुम्ही फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर तुम्ही तुमच्या बायकोच्या नावाने गुंतवणूक करायला हवी. तुम्ही जर तुमच्या घरातील लक्ष्मी च्या नावाने फिक्स डिपॉझिट मध्ये पैसे गुंतवले तर तुम्हाला लक्ष्मी मातेच्या कृपेने अधिकचा फायदा मिळणार आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की भारतात मुदत ठेवीतून मिळालेल्या रिटर्नवर म्हणजेच व्याजावर टीडीएस भरावा लागतो. यासाठी FD मधून मिळणारे उत्पन्न तुमच्या एकूण उत्पन्नात जोडले जाते. त्यामुळे तुम्हाला जास्त कर भरावा लागतो.
पण तुम्हाला जर एफडी मधून मिळणाऱ्या उत्पन्नावरील कर वाचवायचा असेल अर्थातच टीडीएस वाचवायचा असेल तर तुम्ही तुमच्या पत्नीच्या नावाने गुंतवणूक करायला हवी. साधारणपणे स्त्रिया एकतर खालच्या टॅक्स ब्रॅकेटमध्ये येतात किंवा त्या गृहिणी असतात. गृहिणी कोणताही कर भरण्यास पात्र ठरत नाही.
अशा परिस्थितीत, जर तुम्ही तुमच्या पत्नीच्या नावावर एफडी केली तर तुम्ही केवळ टीडीएसचं नाही, तर जादा कर सुद्धा वाचवू शकणार आहात. एखाद्या आर्थिक वर्षात FD वरून मिळणारे व्याज 40,000 रुपयांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला 10 टक्के TDS भरावा लागतो.
पण, जर तुमच्या पत्नीचे उत्पन्न कमी असेल तर ती फॉर्म 15G भरून TDS भरणे टाळू शकते. जर तुम्ही तुमच्या पत्नीसोबत संयुक्त एफडी केली आणि तिला प्रथम धारक बनवले, तरीही तुम्ही TDS तसेच जास्तीचा भरावा लागणार कर वाचवू शकता.