FD News : एफडी अर्थातच फिक्स डिपॉझिट हा गुंतवणुकीचा एक सुरक्षित प्रकार म्हणून ओळखला जातो. फिक्स डिपॉझिट मध्ये ज्येष्ठ नागरिक अन महिला मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात. अलीकडे, बँकांच्या माध्यमातूनही फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना चांगला जोरदार परतावा दिला जातोय.
म्हणून FD चा पर्याय हा बेस्ट ठरतोय. जर तुम्हालाही नजीकच्या भविष्यात फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करायची असेल आणि मुदत ठेवीवर अधिक व्याज हवे असेल तर आज आम्ही तुम्हाला फिक्स डिपॉझिट चा एक उत्तम पर्याय सांगणार आहोत.
खरेतर, डिजिटल प्लॅटफॉर्म तुम्हाला एफडीवर ९.५ टक्के व्याज देत आहे. फायनान्शिअल डिजिटल प्लॅटफॉर्म MobiKwik ने वित्तीय सेवा कंपन्यांच्या भागीदारीत आपल्या मोबाईल ॲपवर इन्स्टंट फिक्स्ड डिपॉझिट (FD) उत्पादने ऑफर करण्याची घोषणा केली आहे.
MobiKwik ने एका निवेदनात म्हटले आहे की, या आर्थिक उत्पादनाचा उद्देश त्याच्या वापरकर्त्यांसाठी बचत प्रक्रिया सुलभ करणे हा आहे. कंपनी फिक्स्ड डिपॉझिट वापरकर्त्यांना 1,000 रुपयांपासून गुंतवणूक करण्यास आणि नवीन बँक खाते न उघडता वार्षिक 9.5 टक्क्यांपर्यंत परतावा मिळविण्याची ऑफर देते.
वापरकर्ते सात दिवसांपासून ते 60 महिन्यांपर्यंत ठेव कालावधी निवडू शकतात. MobiKwik ने एका निवेदनात म्हटले आहे की, या आर्थिक उत्पादनाचा उद्देश त्याच्या वापरकर्त्यांसाठी बचत प्रक्रिया सुलभ करणे हा आहे.
MobiKwik वेबसाइटनुसार, त्यांनी FD ऑफर करण्यासाठी महिंद्रा फायनान्स, श्रीराम फायनान्स आणि बजाज फिनसर्व्हसोबत भागीदारी केली आहे. याशिवाय MobiKwik ने सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक, बजाज फायनान्स आणि इतर NBFC सोबत भागीदारी केलेली आहे.
या ऑनलाइन एफडीचे फायदे बघायचे झाले तर, यात गुंतवणूक करण्यासाठी नवीन बँक खात्याची गरज नाही: गुंतवणूक सुरू करण्यासाठी तुम्हाला नवीन बँक खाते उघडण्याच्या त्रासातून जाण्याची गरज राहणार नाही.
उच्च व्याज दर मिळणार FD वर व्याज दर 9.5% पर्यंत आहेत, जे बहुतेक बँकांपेक्षा खूप जास्त आहे. कार्यकाळ निवडण्याचा पर्याय तुमच्याकडे राहणार आहे. म्हणजे आर्थिक गरजांनुसार FD चा कालावधी निवडण्याचा पर्याय तुम्हाला येथे मिळणार आहे.