FD News : जर तुम्हीही येत्या काही दिवसात फिक्स डिपॉझिट मध्ये पैसा गुंतवण्याचा तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजचा लेख कामाचा राहणार आहे. फेडरल रिझर्व्हने पुन्हा व्याजदरात 25 बेसिस पॉइंट्स म्हणजेच 0.25 टक्के कपात केली.
यूएस सेंट्रल बँकेच्या या निर्णयाचा भारतासारख्या इतर देशांनाही फटका बसण्याची शक्यता आहे. अलीकडेच काही भारतीय बँकांनी त्यांच्या मुदत ठेवींवरील (FD) व्याजदरात बदल केले आहेत. येस बँकेने काही एफडीचे व्याजदर २५ बेसिस पॉईंटने कमी केले आहेत.
अशा परिस्थितीत, जर तुम्ही एफडीमध्ये पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल आणि त्यावर सर्वाधिक परतावा मिळवायचा असेल, तर गुंतवणूक करण्यापूर्वी एफ डी वर सर्वाधिक व्याज कोणत्या बँकेकडून दिले जाते याची माहिती जाणून घेणे तुमच्यासाठी आवश्यक राहणार आहे.
ही बँक देते एफडीवर सर्वाधिक व्याज
नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँक : ही बँक 546 दिवसांपासून ते 1111 दिवसांपर्यंतच्या एफडीवर आपल्या ग्राहकांना सर्वाधिक व्याजदर ऑफर करत आहे. या कालावधीच्या एफडीवर नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँकेकडून तब्बल नऊ टक्के दराने व्याज दिले जात असल्याची माहिती हाती आली आहे.
युनिटी स्मॉल फायनान्स बँक : युनिटी स्मॉल फायनान्स बँक ही देशातील एक प्रमुख फायनान्स बँक आहे. या बँकेकडून आपल्या ग्राहकांना एक हजार एक दिवसाच्या एफडीवर सर्वाधिक व्याजदर दिले जात आहे. ही बँक 1001 दिवसाच्या एफडीवर ग्राहकांना नऊ टक्के दराने व्याज ऑफर करत आहे.
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक : नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँक आणि युनिटी स्मॉल फायनान्स बँक पाठोपाठ सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक आपल्या ग्राहकांना सर्वाधिक व्याजदर ऑफर करत आहे.
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक आपल्या ग्राहकांना कमाल 8.60% दराने व्याज देते. दोन वर्षांपेक्षा जास्त आणि तीन वर्ष कालावधीपर्यंतच्या एफडीवर सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेकडून 8.60% या दराने व्याज दिले जात असल्याची माहिती बँकेकडून हाती आली आहे.
उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक : उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक आपल्या ग्राहकांना दोन वर्ष ते तीन वर्ष कालावधीच्या अन 1500 दिवसांच्या एफ डी वर सर्वात जास्त व्याज ऑफर करते. या कालावधीच्या एफडीवर उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेकडून 8.50% या दराने व्याज दिले जाते.