FD News : फिक्स डिपॉझिट अर्थातच मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी आजची बातमी खूपच कामाचे ठरणार आहे. खरे तर अलीकडे मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कारण की मुदत ठेव योजनेत पैसे गुंतवणाऱ्यांना बँकांच्या माध्यमातून चांगले व्याजदर ऑफर केले जात आहे.
देशातील अनेक सरकारी आणि खाजगी बँका फिक्स डिपॉझिट वर चांगला परतावा देत असल्याने अनेक महिला, ज्येष्ठ नागरिक यात पैसे गुंतवत आहेत. फिक्स डिपॉझिट मध्ये केलेली गुंतवणूक ही पूर्णपणे सुरक्षित असते यामुळे देखील या ठिकाणी गुंतवणुकीचे प्रमाण वाढत चालले आहे.
अलीकडील काळात देशातील अनेक बँकांनी व्याजदरात वाढ केली असून याचा सर्वसामान्य गुंतवणूकदारांना मोठा फायदा होतोय. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, बँका आणि वित्तीय संस्था वेळोवेळी मुदत ठेवींवरील व्याजदर बदलत असतात.
अलीकडेच सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब आणि सिंध बँकेने सुद्धा मुदत ठेवींवरील व्याजदरात बदल केले आहेत. महत्त्वाची बाब अशी की बँकेकडून लागू करण्यात आलेले नवे दर प्रभावी सुद्धा झाले आहेत. म्हणजेच आता या बँकेत फिक्स डिपॉझिट करणाऱ्या गुंतवणूकदारांना नव्या रेटनुसार परतावा दिला जाणार आहे.
3 कोटी रुपयांपेक्षा कमी गुंतवणूक करणारे ग्राहक हा लाभ घेऊ शकतात. ही सरकारी बँक सामान्य नागरिकांना 7 दिवस ते 10 वर्षांच्या कालावधीत 4% ते 7.50% पर्यंत व्याज देत आहे. ही बँक देशातील अनेक खाजगी आणि सरकारी बँकांप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांना ०.५०% अतिरिक्त व्याज देत आहे.
ही बँक 1 वर्षाच्या FD वर 6.30% पर्यंत व्याज देत आहे. त्याच वेळी, 151 दिवसांच्या FD वर 6% पर्यंत व्याज उपलब्ध आहे. आता आपण बँकेकडून कोणत्या कालावधीच्या एफडीवर सर्वाधिक व्याज दिले जाते याबाबत माहिती पाहणार आहोत.
ही सरकारी बँक आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ५५५ दिवसांच्या नॉन-कॉलेबल एफडीवर सर्वाधिक व्याज देत आहे, या कालावधीच्या एफ डी मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना बँकेकडून ७.५०% दराने व्याज दिले जात आहे. बँक समान कालावधीच्या कॉलेबल एफडीवर 7.45% व्याज देत आहे.
शिवाय, ही बँक ९९९ दिवसांच्या कॉलेबल एफडीवर ७.४०% व्याज देत आहे आणि नॉन-कॉलेबल एफडीवर ६.६५% व्याज देते आहे. तसेच बँकेकडून 333 दिवसांच्या एफडीवर ग्राहकांना 7.20% या दराने परतावा दिला जातोय.