FD News : जर तुम्हालाही शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट करायची असेल आणि यासाठी तुम्ही फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे. फिक्स डिपॉझिट म्हणजेच मुदत ठेव योजनेत अलीकडे गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
महिला वर्ग देखील आता फिक्स डिपॉझिट मध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत असल्याचे दिसते. कारण की फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना अलीकडे बँकांच्या माध्यमातून चांगले व्याज ऑफर केले जात आहे.
अलीकडे, 400 ते 444 दिवसांच्या विशेष एफडी योजना अनेक बँकांमध्ये उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे देशातील अनेक बँका या कालावधीच्या एफडीवर चांगले व्याज देत आहेत. आता आपण 400 ते 444 दिवसांच्या एफडीवर सर्वाधिक व्याज ऑफर करणाऱ्या बँकांची माहिती जाणून घेऊया.
युनियन बँक ऑफ इंडिया : युनियन बँक ऑफ इंडिया ही सरकारी बँक सामान्य ग्राहकांना 399 दिवसांच्या एफडीवर 7.25% आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.75% व्याज ऑफर करत आहे.
PNB : पंजाब नॅशनल बँक ही देशातील एक प्रमुख सरकारी बँक आहे. ही बँक 400 दिवसांच्या FD वर सामान्य नागरिकांना 7.25%, ज्येष्ठ नागरिकांना 7.75% आणि अति ज्येष्ठ नागरिकांना 8.05% पर्यंत व्याज देत आहे.
कॅनरा बँक : कॅनरा बँक ही देशातील एक प्रमुख बँक आहे. ही बँक 444 दिवसांच्या FD वर सर्वसामान्य नागरिकांना 7.25% आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.75% पर्यंत व्याज ऑफर करत आहे.
SBI : स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थातच एसबीआय देशातील सर्वात मोठी सरकारी बँक. ही बँक आपल्या ग्राहकांसाठी 400 दिवस अमृत कलश योजना चालवत आहे. ज्यावर सामान्य लोकांना 7.10% व्याज मिळत आहे आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.60% व्याज मिळत आहे. तर ४४४ दिवसांच्या अमृत वृष्टी एफडीवर सर्वसामान्य नागरिकांना ७.२५% वार्षिक तर ज्येष्ठ नागरिकांना ७.७५% व्याज मिळत आहे.
बँक ऑफ बडोदा : बँक ऑफ बडोदा ही देखील देशातील एक प्रमुख सरकारी बँक आहे. देशातील बारा सरकारी बँकांमध्ये या बँकेचाही समावेश होतो. ही बँक 400 दिवसांच्या एफडीवर, सामान्य नागरिकांना 7.00% आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.50% व्याज ऑफर करत आहे.