स्पेशल

FD करणाऱ्यांना मिळणार जबरदस्त परतावा ! थेट 9.50% दराने व्याज मिळणार, कोणती बँक देते सर्वाधिक व्याज ? वाचा….

FD News : FD अर्थातच फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आजची ही बातमी खूपच कामाची ठरणार आहे. खरे तर, फिक्स डिपॉझिट मधून अपेक्षित परतावा मिळत नाही अशी तक्रार अनेकांच्या तोंडून ऐकली जाते. पण अलीकडे बँकांनी फिक्स डिपॉझिट वर देखील चांगले व्याजदर ऑफर केले आहेत.

देशातील अनेक प्रमुख बँकांच्या माध्यमातून सर्वसामान्य ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एफडीवर चांगले व्याज दिले जात आहे. दरम्यान जर तुम्ही येत्या काही दिवसांनी आपल्याकडील पैसा फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे.

खरे तर फिक्स डिपॉझिट मध्ये ज्येष्ठ नागरिक आणि महिला वर्ग मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षित गुंतवणूक आणि एक निश्चित परतावा हवा असतो यामुळे फिक्स डिपॉझिट हा पर्याय ज्येष्ठ नागरिकांसाठी फायद्याचा ठरतो.

दरम्यान आज आपण देशातील अशा दोन प्रमुख बँकांची माहिती जाणून घेणार आहोत ज्या की ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना फिक्स डिपॉझिट वर चांगले व्याजदर ऑफर करत आहेत. आज आपण फिक्स डिपॉझिट वर सीनियर सिटीजन ग्राहकांना 9.50% व्याजदर ऑफर करणाऱ्या दोन बँकांची माहिती जाणून घेणार आहोत.

कोणती बँक देते सर्वाधिक व्याज

नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँक : ही देशातील प्रमुख स्मॉल फायनान्स बँक आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एफ डी वर चांगले व्याज ऑफर करते. नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँक 546 दिवसांपासून ते 1111 दिवसाच्या एफडीवर सीनियर सिटीजन ग्राहकांना तब्बल 9.50% दराने व्याज ऑफर करत असल्याची माहिती बँकेकडून समोर आली आहे.

यामुळे ज्या ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना आपल्याकडील पैसा फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवायचा असेल त्यांच्यासाठी नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँकेचा पर्याय परफेक्ट ठरणार आहे. तुमच्याही घरात कोणी सीनियर सिटीजन असतील आणि त्यांना फिक्स डिपॉझिट मध्ये आपला पैसा गुंतवायचा असेल तर त्यांना तुम्ही नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँकेचे सजेशन देऊ शकता.

युनिटी स्मॉल फायनान्स बँक : नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँकेप्रमाणेच युनिटी स्मॉल फायनान्स बँक देखील देशातील एक प्रमुख स्मॉल फायनान्स बँक म्हणून ओळखली जाते. युनिटी स्मॉल फायनान्स बँक आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी फिक्स डिपॉझिट वर गुंतवणूक करणाऱ्यांना चांगला परतावा देते.

मिळालेल्या माहितीनुसार युनिटी स्मॉल फायनान्स बँक जेष्ठ नागरिक ग्राहकांना सामान्य ग्राहकांच्या तुलनेत अधिकचे व्याज देत आहे. ही बँक 1001 दिवसांच्या एफडी योजनेमध्ये गुंतवणूक करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना तब्बल 9.50% दराने व्याज ऑफर करत असल्याची माहिती बँकेकडून हाती आली आहे. नक्कीच सीनियर सिटीजन ग्राहकांसाठी बँकेची ही एफडी योजना खूपच फायदेशीर ठरणार आहे.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com

Published by
Tejas B Shelar

Recent Posts