FD News : तुम्हाला तुमची बचत सुरक्षित आणि विश्वासार्ह मार्गाने वाढवायची असेल, तर तुमच्यासाठी फिक्स डिपॉझिट म्हणजेच मुदत ठेव हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. महिला वर्ग आणि ज्येष्ठ नागरिक यामध्ये मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवताना दिसतात. विशेष बाब म्हणजे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक मोठ्या बँका FD वर आकर्षक व्याजदर देत आहेत, ज्यामुळे तुमची ठेव चांगल्या रकमेत रूपांतरित होऊ शकते.
पण प्रश्न असा आहे की जर तुम्ही एफडीमध्ये 5 लाख रुपये जमा केले तर तुम्हाला कोणती बँक सर्वात जास्त परतावा देईल ? दरम्यान आज आपण देशातील अशा टॉप पाच बँकांची माहिती जाणून घेणार आहोत जिथे गुंतवणूकदारांनी पाच लाख रुपये गुंतवल्यास त्यांना सर्वाधिक रिटर्न मिळू शकणार आहेत. यामुळे जर तुम्हालाही एफडी मध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे.
कुठं मिळणार चांगले रिटर्न?
HDFC : एचडीएफसी ही देशातील सर्वात मोठी बँक. ही प्रायव्हेट सेक्टर मधील बँक 15 महिन्यांपासून ते 18 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर सामान्य ग्राहकांना 7.25% दराने परतावा देते. या पंधरा महिन्यांच्या एफ डी मध्ये जर ग्राहकांनी पाच लाख रुपये गुंतवले तर त्यांना पाच लाख 42 हजार 312 रुपये मिळणार आहेत.
SBI : SBI ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक. भारतात एकूण 12 पब्लिक सेक्टर बँक आहेत आणि यात एसबीआय ही सर्वात मोठी बँक. ही बँक आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एक विशेष एफडी योजना ऑफर करत आहे. 444 दिवसांची अमृत वृष्टी विशेष एफडी योजना एसबीआय कडून ऑफर केले जात असून यामध्ये ग्राहकांना 7.25% दराने परतावा मिळतोय. यामध्ये जर एखाद्या ग्राहकाने पाच लाख रुपये गुंतवले तर त्याला पाच लाख 44 हजार रुपये मिळतात. म्हणजेच 44 हजार रुपये व्याज म्हणून रिटर्न मिळतात.
आयसीआयसीआय बँक : ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी प्रायव्हेट सेक्टर मधील बँक. ही प्रायव्हेट सेक्टर मधील बँक 15 महिन्यांपासून ते 18 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर सामान्य ग्राहकांना 7.25% दराने परतावा देते. या बँकेच्या सदर पंधरा महिन्यांच्या एफडी मध्ये जर ग्राहकांनी पाच लाख रुपये गुंतवले तर त्यांना पाच लाख 42 हजार 312 रुपये मिळणार आहेत. म्हणजेच ग्राहकांना या कालावधीच्या एफडी मधून पाच लाख रुपये गुंतवून 42 हजार 312 रुपयांचा परतावा मिळवता येतो.
पंजाब नॅशनल बँक : ही बँक आपल्या ग्राहकांना एक वर्षांपेक्षा अधिक आणि दोन वर्ष कालावधीच्या एफडी वर सर्वाधिक व्याज देते. या एफ डी मध्ये गुंतवणूक करणारा ग्राहकांना सात टक्के दराने परतावा दिला जातो. या एफ डी मध्ये दोन वर्षांसाठी एखाद्या ग्राहकाने पाच लाख रुपये गुंतवले तर त्याला पाच लाख 70 हजार रुपये मिळतात, म्हणजे 70 हजार रुपये रिटर्न मिळतात.
ऍक्सीस बँक : ही बँक दोन वर्षांपासून ते 30 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर 7.10% दराने परतावा देते. जर या बँकेच्या दोन वर्षांच्या एफडी मध्ये एखाद्या ग्राहकाने 5 लाखांची गुंतवणूक केली तर त्याला पाच लाख 71 हजार रुपयांचा परतावा मिळतो. म्हणजेच यातून 71 हजार रुपयांचा परतावा ग्राहकांना मिळतो.