FD News : फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील अनेक बँका फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना चांगला परतावा देत आहेत. आज आपण देशातील अशा काही बँकांची माहिती जाणून घेणार आहोत ज्या की फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना सर्वाधिक व्याज ऑफर करतात.
आम्ही आपणास सांगू इच्छितो क, देशात अशा काही एनबीएफसी आहेत ज्या ग्राहकांना फिक्स डिपॉझिट वर नऊ टक्क्यांपर्यंतच्या रेटने व्याज देतात. अलीकडे, देशातील काही बँकांनी मुदत ठेव योजनेवरील व्याजदरात कपात केली आहे.
पण ज्या छोट्या बँका आहेत त्या आजही ग्राहकांना चांगले व्याजदर ऑफर करत आहोत. खरे तर फिक्स डिपॉझिट मध्ये केलेली गुंतवणूक ही पूर्णपणे सुरक्षित असते.
त्यामुळे सुरक्षित गुंतवणुकीसाठी आजही मुदत ठेव योजनेत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होताना दिसते. विशेषतः जेष्ठ नागरिक आणि महिला वर्ग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवताना दिसत आहेत.
या बँका तीन वर्षाच्या एफडीवर देतात सर्वाधिक व्याज!
नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँक : ही स्मॉल फायनान्स बँक एफडी करणाऱ्यांना सर्वाधिक परतावा देते. मिळालेल्या माहितीनुसार, नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँक तीन वर्षे कालावधीच्या एफ डी वर सामान्य ग्राहकांना सर्वाधिक 9% दराने व्याज देते. ही स्मॉल फायनान्स बँक जेष्ठ नागरिकांना सामान्य ग्राहकांच्या तुलनेत अधिक व्याज देते.
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक : या यादीत सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेचा देखील समावेश होतो. ही बँक आपल्या सामान्य ग्राहकांना तीन वर्ष कालावधीच्या एफडीवर 8.60% दराने व्याज ऑफर करत आहे. नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँकेप्रमाणेचं सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक देखील जेष्ठ नागरिकांना एफडी वर अधिकचे व्याज देते.
उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक : नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँक आणि सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेनंतर उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक आपल्या ग्राहकांना एफडीवर सर्वाधिक व्याज देते. ही बँक सामान्य ग्राहकांना तीन वर्ष कालावधीच्या एफडीवर 8.50% दराने व्याज ऑफर करत आहे. महत्वाची बाब अशी की ज्येष्ठ नागरिकांना या बँकेकडून अधिकचा परतावा दिला जातोय.