FD News : नवीन वर्ष सुरू होण्यास आता अवघ्या काही दिवसांचा काळ बाकी राहिला आहे. दरम्यान हे नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी अनेक बँकांनी मुदत ठेवींवरील व्याजदरात बदल केले आहेत. या यादीत बँक ऑफ महाराष्ट्रचाही समावेश आहे. या बँकेने नुकत्याच काही दिवसांपूर्वी फिक्स डिपॉझिट वर लागू असणाऱ्या व्याज दरात बदल केलेला आहे.
महत्त्वाचे म्हणजे बदल करण्यात आलेले नवे दर प्रभावी सुद्धा झाले आहेत. यामुळे जर तुम्हाला आगामी काळात फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करायची असेल तर बँक ऑफ महाराष्ट्राचा पर्याय देखील तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.
बँक ऑफ महाराष्ट्र ने अलीकडेच आपल्या एफडी बॅच दरात सुधारणा केली असून या सरकारी बँकेने काही कालावधीच्या एफडी व्याजदरात वाढ केलेली आहे. यामुळे गुंतवणूकदारांना बँकेच्या निर्णयाचा फायदा होणार आहे. ही सरकारी बँक 7 दिवसांपासून ते 5 वर्षांपेक्षा जास्त कालावधीच्या FD वर आकर्षक व्याज देत आहे.
ही बँक काही विशेष एफडी योजना देखील ऑफर करत आहे. ही बँक ज्येष्ठ नागरिकांना ०.५% अतिरिक्त व्याज देत आहे. मात्र 91 दिवसांपेक्षा जास्त कालावधीसाठीच्या FD योजनांसाठीच हे अतिरिक्त व्याज उपलब्ध आहे.
बँक 3 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवर सर्वसामान्य नागरिकांसाठी किमान 2.75% आणि कमाल 7.35% व्याज देत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी किमान व्याज दर 2.75 टक्के आणि कमाल 7.85 टक्के आहे. आज आपण बँक ऑफ महाराष्ट्र आणि सुरू केलेल्या काही स्पेशल एफडी योजनांची माहिती पाहणार आहोत.
आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र कडून स्पेशल एफडी योजना सुरू करण्यात आल्या असून आता आपण याच योजनांची थोडक्यात माहिती जाणून घेऊयात.
बँक ऑफ महाराष्ट्र स्पेशल एफडी योजना
बँक ऑफ महाराष्ट्रने आपल्या ग्राहकांसाठी चार विशेष एफडी योजना सुरू केलेले आहेत. ज्यामध्ये सामान्य एफडीपेक्षा जास्त व्याज दिले जात आहे. 200 दिवसांच्या विशेष मुदत ठेवीवर, सामान्य नागरिकांना 6.90% आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.40% व्याज मिळत आहे.
बँक सर्वसामान्य नागरिकांना ३३३ दिवसांच्या विशेष एफडीवर ७.३५ टक्के, ४०० दिवसांच्या एफडीवर ७.१० टक्के आणि ७७७ दिवसांच्या एफडीवर ७.२५ टक्के व्याज देत आहे.
अर्थातच दोनच्या दिवसांच्या विशेष मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना बँक ऑफ महाराष्ट्र कडून चांगला परतावा मिळतोय. यामुळे ज्या सीनियर सिटीजन ग्राहकांना कमी दिवसात अधिकचा परतावा हवा असेल त्यांनी या ठिकाणी गुंतवणूक करायला काही हरकत नाही.