Gas Cylinder Price : जुलै 2024 नंतर थेट जानेवारी 2025 मध्ये गॅस सिलेंडरच्या किमती कमी झाल्या आहेत. यामुळे, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी देशातील सर्वसामान्यांमध्ये आनंदाची लाट पाहायला मिळत आहे. खरंतर गेल्या पाच महिन्यांपासून गॅस सिलेंडरच्या किमती सातत्याने वाढत होत्या. लोकसभा निवडणुकीच्या आधी गॅस सिलेंडरच्या किमती कमी झाल्यात आणि त्यानंतर सातत्याने किमती वाढत आहेत.
19 किलो वजनी गॅस सिलेंडरच्या किमती गेल्या पाच महिन्यांपासून वाढत आहेत. जानेवारी 2025 मध्ये मात्र व्यावसायिक गॅस सिलेंडर म्हणजेच 19 किलो वजनी गॅस सिलेंडरच्या किमती कमी झाल्या आहेत. व्यवसाय गॅस सिलेंडरच्या किमती 16 रुपयांपर्यंत कमी झाल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रीय राजधानी दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत 14.5 रुपयांची घसरण झाली. येथे गॅस किंमत 1,804 रुपये झाली. तर कोलकत्तामध्ये 16 रुपयांच्या घसरणीसह भाव 1,911 रुपये झाले. मुंबईत 15 रुपयांच्या घसरणीसह भाव 1,756 रुपयांवर आले.
चेन्नईत 14.5 रुपये घसरणीसह 1,966 रुपये झाले आहेत. गेल्या पाच महिन्यात व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत सातत्याने वाढ झाली. जुलै ते डिसेंबर या काळात व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत दिल्लीमध्ये 172.5 रुपयांची दरवाढ नोंदवण्यात आली.
तर कोलकत्ता आणि चेन्नईमध्ये 171 रुपयांनी भाव वधारला. मुंबईत 173 रुपयांनी भाव वाढले. गेल्या डिसेंबर महिन्यात व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या किमती 16.50 रुपयांनी वाढल्या होत्या. पण, एक जानेवारी 2025 पासून व्यवसाय गॅस सिलेंडरच्या किमती कमाल 16 रुपयांपर्यंत कमी झाल्या आहेत.
पण घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती आजही कायम राहिल्यात. लोकसभा निवडणुकीच्या आधी केंद्रातील मोदी सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात कपात केली आणि तेव्हापासून घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती कायम आहेत.
गेल्या सात-आठ महिन्यांपासून घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये कोणताच बदल झालेला नसून यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळतोय. मात्र व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत सातत्याने वाढ होत असल्याने याचा अप्रत्यक्ष फटका सर्वसामान्य नागरिकांनाचं सहन करावा लागतो.
आज व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या किमती थोड्याशा कमी झाल्या आहेत मात्र याचा फारसा फरक पडणार नाही कारण की गेल्या पाच महिन्यात व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या किमती मोठ्या वाढल्या आहेत.
घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती बाबत बोलायचं झालं तर देशाच्या राजधानीत, दिल्लीत घरगुती गॅसची किंमत 803 रुपये, कोलकत्त्यात 829 रुपये, राज्याच्या राजधानीत, मुंबईत हा दर 802.50 रुपये, तर चेन्नईत घरगुती गॅसची किंमत 818.50 रुपये आहे.
मात्र उज्ज्वला सिलेंडर योजनेतील ग्राहकांना सिलेंडरवर 300 रुपयांची सबसिडी देण्यात येते. म्हणजेच उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना घरगुती गॅस सिलेंडर फक्त पाचशे रुपयांमध्ये मिळतो.