स्पेशल

Goat Rearing: ‘या’ जातीच्या शेळीच्या दुधाला आणि मांसाला आहे प्रचंड मागणी! शेळीपालनात कराल पालन तर येईल भरपूर पैसा, वाचा माहिती

शेळीपालन हा शेतीला निगडित असलेला महत्त्वाचा जोडधंदा असून भारतातील शेतकरी अगदी पूर्वापारपासून शेळीपालन व्यवसाय करत आले आहेत. सध्या परिस्थितीत या व्यवसायामध्ये तंत्रज्ञानाची भर पडल्यामुळे हा व्यवसाय आता व्यावसायिक दृष्टिकोनातून केला जातो.

नव्याने शेती क्षेत्रात येऊ घातलेले तसेच सिद्ध करून देखील आता शेळी पालन व्यवसाय मोठ्या प्रमाणावर करताना आपल्याला दिसून येत आहेत. कारण हा व्यवसाय म्हटले म्हणजे खर्च कमी व जागा देखील कमी लागते व त्यामानाने मिळणारा नफा जास्त असतो. त्यामुळे जर तुम्हाला कमी प्रसाद जास्त पैसा मिळवायचा असेल तर शेळी पालन व्यवसाय हा उत्तम पर्याय आहे.

परंतु तुम्हाला या व्यवसायाच्या माध्यमातून चांगला पैसा मिळवायचा असेल तर शेळीपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी दर्जेदार आणि जातिवंत शेळ्यांच्या जातींची निवड करणे खूप महत्त्वाचे ठरेल. कसे पाहायला गेले तर भारतामध्ये शेळ्यांच्या अनेक प्रकारच्या जाती आहेत व त्यातील काही जाती या शेळीपालनासाठी खूपच उपयुक्त व फायदेशीर आहेत. याचा अनुषंगाने या लेखांमध्ये आपण शेळीच्या अशाच एका जाती बद्दल माहिती घेणार आहोत जी शेळीपालनात फायद्याची ठरू शकते.

 शेळीपालनात करा संगमनेरी जातीचे पालन, मिळेल भरपूर नफा

संगमनेरी शेळी ही प्रामुख्याने मांस व दूध उत्पादनासाठी ओळखले जाते. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर हे या जातीचे मूळ स्थान आहे व त्यामुळेच या शाळेला संगमनेरी असे नाव पडले आहे. तसेच महाराष्ट्रातील पुण्यासारख्या जिल्ह्याच्या काही भागात देखील ही शेळी मोठ्या प्रमाणावर आपल्याला आढळून येते.

आपण या शेळीची शारीरिक रचना पाहिली तरी चे शिंगे पातळ, टोकदार असतात व मागच्या बाजूने वळलेली असतात व काहीशी वरच्या दिशेने असतात. तसेच या जातीच्या आठ ते बारा टक्के शेळ्यांना शिंगेच नसतात. तसेच रंगाने या पांढऱ्या तसेच तपकिरी असतात व कान मध्यम व लोंबकळणारे असतात.

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या शेळ्यांमध्ये दाढीचे प्रमाण कमी असते. जेव्हा ही शेळी यायचे तेव्हा अर्धा ते दीड लिटर पर्यंत दूध देते व एकावेळी त्यामध्ये 80 लिटर दूध देते. या शेळीचा एकूण दूध देण्याचा कालावधी सरासरी 180 दिवसांचा असून दोन वेतातील अंतर 333 दिवस असते. प्रथम वयात येण्याचे वय आठ महिने आहे व पहिल्यांदा गाभण राहण्याचे वय 14 महिन्याचे असते.

संगमनेरी जातीच्या शेळी समाजाचा कालावधी 41 तासांचा असतो व दोन माजामधील अंतर 17 दिवसांची असते. जर आपण संगमनेरी जातीच्या मादी शेळीचे वजन पाहिले तर ते 32 किलोपर्यंत भरते व नराचे वजन 39 किलो पर्यंत असते. संगमनेरी जातीचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या जातीच्या करडांचा जेव्हा जन्म होतो तेव्हाच त्यांचे वजन एक ते दीड किलोच्या जवळपास असते.

तसेच शेळीपालनामध्ये गोठ्यातील शेळ्यांची संख्या वाढवण्याच्या दृष्टिकोनातून देखील संगमनेरी जात फायद्याचे आहे. जर आपण या शेळीचे करडू देण्याचे प्रमाण पाहिले तर एक कडू देण्याचे प्रमाण 75 टक्के आहे तर जुळी करडे देण्याचे प्रमाण 21% आहे व तीन पिल्ले देण्याचे प्रमाण चार टक्के आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts