इलेक्ट्रिक वाहनांचा वापराचा ट्रेंड दिवसेंदिवस वाढताना दिसून येत असून ग्राहक हे विविध प्रकारच्या बाईक्स तसेच इलेक्ट्रिक स्कूटर्स आणि कार खरेदीकडे वळताना आपल्याला दिसून येत आहेत. त्यामुळे वाहन उत्पादक कंपन्या देखील ग्राहकांची गरज व पसंती हेरून त्यात्या वैशिष्ट्यांनी आणि परवडणाऱ्या किमतीत इलेक्ट्रिक वाहने लॉन्च करत आहेत.
इलेक्ट्रिक कार उत्पादनाच्या बाबतीत पाहिले तर देशातील अनेक नामांकित कंपन्यांनी यामध्ये पाऊल ठेवले असून अनेक बाईक उत्पादक कंपन्या देखील आता इलेक्ट्रिक बाइक्स तसेच स्कूटर निर्मितीकडे वळले आहेत.
अगदी याच पद्धतीने जर आपण इलेक्ट्रिक स्कूटरचे मार्केट पाहिले तर यामध्ये अनेक नामांकित कंपन्या उतरले आहेत व त्यासोबत गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्स या इलेक्ट्रिक दुचाकी व तीन चाकीच्या इब्लु सिरीजच्या उत्पादक कंपनीने भारतातील पहिली फॅमिली इ स्कूटर इब्लु फिओ एक्स लॉन्च केल्याची घोषणा केली.
गोदावरी मोटरने लॉन्च केली इब्लू फिओ एक्स इलेक्ट्रिक स्कूटर
याबाबत सविस्तर वृत्त असे की, गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्स ही इलेक्ट्रिक दुचाकी व तीन चाकीच्या इब्लू श्रेणीची उत्पादक कंपनी असून या कंपनीने भारतातील पहिली फॅमिली इ स्कूटर इब्लू फिओ एक्सच्या नवीन व्हेरिएंटच्या लॉन्चची घोषणा केली असून ग्राहकांच्या गरजा ओळखून ही स्कूटर तयार करण्यात आलेली आहे.
काय आहेत या इलेक्ट्रिक स्कूटर मधील वैशिष्ट्ये?
गोदावरी मोटरची इब्लू फिओ एक्स ही पाच रंगांमध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहे व यामध्ये सायन ब्ल्यू, वाईन रेड, जेट ब्लॅक, टेलिग्रे व ट्रॅफिक व्हाईट या रंगांचा समावेश आहे. जर तुम्ही या स्कूटरने रात्रीचा प्रवास कराल तर स्पष्ट दृश्यमानते करिता उच्च रिझोल्युशन AHO एलईडी हेडलॅम्प व एलईडी टेललॅम्प देखील या स्कूटरला देण्यात आलेले आहेत.
तसेच पुढील आणि मागच्या दोन्ही साठी सेन्सर इंडिकेटरसह साईड स्टॅन्ड आणि 12 इंचाचे अदलाबदल करता येतील असे ट्यूबलेस टायर्स देण्यात आलेले आहेत. तसेच या स्कूटरमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी देण्यात आली असून प्रशस्त असा फ्लोअर बोर्ड देण्यात आला असून यामध्ये गॅस सिलेंडर देखील ठेवता येणे शक्य होणार आहे.
त्यामुळे या स्कूटरची व्यावहारिकता अधिकच वाढते. या स्कूटरमध्ये एक स्टोरेज बॉक्स आणि मोबाईल चार्जिंग पॉइंट देखील समाविष्ट करण्यात आलेला आहे व यामुळे तुम्ही प्रवासात देखील तुमचा मोबाईल चार्जिंग करू शकता. या बाईकमध्ये 2.36 केडब्ल्यू ली आयन बॅटरी उच्च पावर साठी 110 एनएम सर्वाच्च टॉर्कची निर्मिती करते. ही एका चार्जमध्ये आरामदायी 110 किलोमीटरची रेंज देण्यात सक्षम आहे.
तसेच या बाईकला आरामदायी प्रवासासाठी 60 किलोमीटर प्रति तासाचा टॉप स्पीड देण्यात आलेला आहे. तसेच १८५० मिमीची लक्षणीय अशी लांबी या स्कूटरला आकर्षक बनवते. तसेच खराब रस्ते किंवा चढउताराचा सामना व्यवस्थित करता यावा याकरिता या इलेक्ट्रिक स्कूटरचा ग्राउंड क्लिअरन्स 170 mm चा आहे व्हिलबेस 1345 मीमी इतका आहे.
किती आहे या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत?
गोदावरी मोटर्सच्या या नवीन व्हेरिएंटची एक्स शोरूम किंमत 99999 रुपये आहे.इब्लू फिओ एक्स आता 28 लिटर स्टोरेज स्पेस ऑफर करण्यात येईल व या स्कूटरमध्ये 2.36 के डब्ल्यू बॅटरी असणार आहे.