स्पेशल

सोने-चांदीच्या दरांनी नागरिकांना फोडला घाम! वाचा अहिल्यानगरसह महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील सोन्या-चांदीचे दर

Gold-Silver Price Today:- गेल्या काही दिवसापासून सोन्या आणि चांदीच्या दरामध्ये सातत्याने वाढ होत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर सोने आणि चांदीची खरेदी गेल्याचे सध्याचे चित्र आहे. त्यातच आता सध्या लग्नसराईचा कालावधी असल्याने बऱ्याच जणांना सोन्याने चांदीची खरेदी करण्याशिवाय पर्याय नाही व त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसण्याची शक्यता या कालावधीत आहे.

काल म्हणजे 11 डिसेंबर रोजी जर आपण सोन्याचांदीचे दर पाहिले तर काल देखील यामध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून आली होती व काल 24 कॅरेट सोन्याच्या एक तोळ्याच्या दरामध्ये साधारणपणे 694 रुपयांची वाढ होऊन तो 77 हजार 869 रुपयांवर होता तर चांदीच्या दरात देखील 28 रुपयांनी वाढ होऊन प्रतिकिलो 92 हजार 838 रुपये होता.

त्या तुलनेत जर आपण आज 12 डिसेंबर 2024 रोजी असलेले सोने आणि चांदीचे दर बघितले तर त्यामध्ये कालच्या तुलनेत काहीशी वाढ झाल्याचे आपल्याला दिसून येत आहे.

काय आहेत आजचे सोने आणि चांदीचे दर?
आज 12 डिसेंबर रोजीचे जर आपण सोने चांदीचे दर पाहिले तर त्यामध्ये काहीशी वाढ झाल्याचे दिसून येत असून आज 24 कॅरेटच्या एक तोळा म्हणजेच दहा ग्राम सोन्याची किंमत 79 हजार 470 रुपये असून एक ग्रॅमची किंमत साधारणपणे 7947 रुपये आहे.

तसेच 22 कॅरेट सोन्याच्या दहा ग्रॅम म्हणजेच एक तोळ्याची किंमत आज 72 हजार 850 रुपये असून एक ग्रॅम 22 कॅरेट सोने तुम्हाला आज 7250 रुपयाला मिळेल.

इतकेच नाहीतर चांदीच्या दरात देखील आज वाढ झाली असून आज एक किलो चांदीची किंमत 95 हजार पाचशे रुपये तर 100 ग्रॅम चांदीची किंमत 9550 रुपये इतकी आहे.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील सोने-चांदीचे दर

1- अहिल्यानगर- अहिल्यानगर येथे आज 24 कॅरेट सोन्याच्या एक तोळ्याची किंमत 79 हजार 470 रुपये तर 22 कॅरेट सोन्याच्या एक तोळ्याची किंमत 72 हजार 850 रुपये आहे. तसेच चांदीची किंमत प्रति किलो 95 हजार पाचशे रुपये आहे.

2- छत्रपती संभाजीनगर– येथे देखील आज 24 कॅरेट एक तोळा सोन्याची किंमत 79 हजार 470 रुपये असून 22 कॅरेट सोन्याच्या एक तोळ्याची किंमत 72 हजार 850 रुपये आहे. तर एक किलो चांदीची किंमत 95 हजार पाचशे रुपये आहे.

3- बीड- या ठिकाणी 24 कॅरेटच्या एक तोळ्याची किंमत 79,470 रुपये असून 22 कॅरेटच्या एक तोळे सोन्याची किंमत 72 हजार 850 रुपये आहे. तसेच चांदीची किंमत प्रतिकिलो 95 हजार पाचशे रुपये आहे.

4- जळगाव- जळगाव येथे 24 कॅरेटच्या एक तोळ्याची किंमत 79 हजार 470 रुपये तर 22 कॅरेटची किंमत 72 हजार 850 प्रति तोळा आहे. तर चांदीची एक किलोची किंमत 95 हजार पाचशे रुपये आहे.

5- मुंबई- मुंबई येथे आज 24 कॅरेटच्या एक तोळे सोन्याची किंमत 79 हजार 470 रुपये तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 72 हजार 850 रुपये आहे. तसेच एक किलो चांदीची किंमत 95 हजार पाचशे रुपये आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts