स्पेशल

Gold Price Today : सोन्यात गुंतवणूक करून पैसा कमावण्याचा विचार आहे का? ही आहे सोने खरेदीची चांगली वेळ?

Gold Price Today :- आपल्यापैकी बरेच जण सोन्यामध्ये गुंतवणूक करतात. सोन्यामध्ये केलेली गुंतवणूक ही परताव्याच्या दृष्टिकोनातून देखील चांगले मानले जाते. त्यामुळे सोन्याचे दर जर घसरले तर गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी करतात. सध्या सोन्याच्या दरामध्ये घसरण दिसून येत आहे.

सोन्याच्या दरामध्ये सातत्याने घसरण सुरू असून या क्षेत्रातील जाणकारांच्या मते सोन्यात गुंतवणूक करून चांगला नफा मिळवण्याचा विचार करणाऱ्या व्यक्तींसाठी खरेदी करायला हा चांगला टाइमिंग असू शकतो. पण गेल्या आठवड्यापासून विचार केला तर 24 कॅरेट सोन्याच्या दरामध्ये लक्षणीयरीत्या घट नोंदवली गेली आहे.

जर आपण संपूर्ण आठवड्याचा विचार केला तर सोमवारी सोन्याचे भाव 59327 रुपये प्रति तोळा म्हणजेच दहा ग्रॅम वर बंद झाले होते व शुक्रवारी सोन्याचा दर हा 58 हजार 905 रुपये होता. म्हणजेच या आकडेवारीवरून लक्षात येते की सोन्याच्या दरात प्रति दहा ग्रॅम मागे 422 रुपयांची घसरण नोंदवण्यात आली आहे.

 सोने 2741 रुपये प्रति दहा ग्रामने स्वस्त

सोन्याच्या बाजारभावाचा विचार केला तर सोने आतापर्यंतच्या विक्रमी दरपातळीवरून  घसरून तब्बल सोन्याच्या दरात 2741 रुपये प्रति तोळा म्हणजेच दहा ग्रॅमने स्वस्त झाले आहे. चार मे 2023 रोजी सोन्याचे भाव सर्वात जास्त होते. तेव्हा सोन्याचा भाव 61 हजार 656 रुपये प्रति दहा ग्राम इतका होता. तसेच चांदीचे दर देखील विक्रमी दर पातळीवरून 6366 रुपयांनी खाली आले आहेत. म्हणजेच चार मे 2023 रोजी चांदीचे दर हे 76 हजार 464 रुपये प्रति किलो होते. नंतर मात्र चांदी  स्वस्त होत आहे.

 सोने आणि चांदी खरेदीची योग्य वेळ असू शकते का?

जर मे महिन्याच्या तुलनेत सोन्या आणि चांदीचा सर्वकालीन उच्चांकी दर गाठला होता. परंतु त्यानंतरच्या कालावधीत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कमकुवत संकेत आणि मागणी कमी झाल्यामुळे सोने,चांदीच्या दरामध्ये लक्षणीय घट नोंदवली गेली आहे. त्यामुळे हा काळ जाणकारांच्या मते सोने आणि चांदीमध्ये गुंतवणूक करून पैसे कमवण्याचा आहे. तुम्ही जर सोन्या आणि चांदीमध्ये गुंतवणूक करून पैसे कमवण्याचा तुमचा विचार असेल तर ही वेळ सोन्याने चांदी खरेदी करण्यासाठी योग्य असू शकते.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts