Gold Price Will Hike : अलीकडे गुंतवणुकीसाठी वेगवेगळे पर्याय उपलब्ध झाले आहेत. बँकेच्या एफडी योजना, सरकारी बचत योजना तसेच रिअल इस्टेट मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या डे बाय डे वाढत आहे. मात्र अशा या परिस्थितीतही अनेक जण आजही सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याला प्राधान्य दाखवतात. या मौल्यवान धातूत केलेली गुंतवणूक कधीच वाया जात नाही असा समज सर्वसामान्यांचा आहे.
महत्त्वाचे म्हणजे सर्वसामान्यांची ही धारणा काहीअंशी खरी ठरते. सोन्यामध्ये गुंतवणूक करून अनेकांनी चांगला नफा मिळवलेला आहे. दरम्यान जर तुम्हीही सोन्यात गुंतवणूक करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी कामाची ठरणार आहे.
खरे तर जर तुम्ही सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करू इच्छित असाल तर तुम्ही आत्ताच सोने खरेदी करायला हवे. कारण की पुढील महिन्यापासून सोन्याच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या शेवटच्या तीन महिन्यांमध्ये सोन्याच्या किमतीत मोठी वाढ होईल आणि एक नवीन विक्रम स्थापित होऊ शकतो.
यामुळे जर तुम्ही आत्ता सोने खरेदी केले तर तुम्हाला आगामी काळात चांगला मोठा नफा मिळणार आहे. खरंतर केंद्रीय अर्थसंकल्पात केंद्रातील मोदी सरकारने सोन्यावरील कस्टम ड्युटी कमी करण्याची घोषणा केली होती. यामुळे प्रति तोळा सोन्याचे भाव 70 हजार रुपयांपेक्षा कमी झाले होते.
मात्र भारताने आता सोन्याच्या साठ्यात वाढ करण्याची घोषणा केली असून यामुळे सोन्याच्या किमती पुन्हा एकदा वाढू लागले आहेत. मात्र फक्त या एकाच कारणाने सोन्याच्या किमती वाढतील असे नाही तर आगामी तीन महिन्यांच्या वेगवेगळ्या कारणांनी सोन्याच्या किमती नवीन आलेख तयार करणार आहेत. आता आपण सोन्याच्या किमती वाढण्याचे कारण थोडक्यात जाणून घेणार आहोत.
1) अमेरिका ठरणार कारणीभूत : खरंतर सोन्याच्या किमती वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून असतात. यामध्ये अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेचे धोरण देखील महत्वाची भूमिका निभावत असते. जाणकारांनी सांगितल्याप्रमाणे अमेरिकेमध्ये सध्या मंदी आहे. यामुळे तेथील फेडरल रिजर्व बँक आपल्या व्याजदरात कपात करण्याची मोठी घोषणा करणार अशी शक्यता आहे. अमेरिकन सरकारवर व्याजदर कमी करण्याबाबत मोठा दबाव आहे. यामुळे लवकरच याबाबतचा निर्णय होईल आणि हा निर्णय झाल्यानंतर सोन्याच्या किमती वाढतील असे मत व्यक्त होत आहे.
2) युद्धजन्य परिस्थितीमुळे गोल्डला सोन्याचे दिवस : सध्या जगातील विविध भागांमध्ये भूराजकीय तणाव पाहायला मिळत आहे. अनेक देशांमध्ये युद्ध सुरू आहे. अलीकडे सुरू झालेले इजराइल-हमास युद्ध आणि रशिया-युकेन मध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक पुरवठा साखळीवर मोठा विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे आर्थिक बाजारात मोठी उलथापालथ सुरू आहे.
हेच कारण आहे की अनेक जण शाश्वत उत्पन्नासाठी आणि युद्धामुळे तयार झालेल्या या अशा परिस्थितीत जोखीम कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सोन्यामध्ये गुंतवणूक करत आहेत. सोन्यामध्ये गुंतवणूक वाढत आहे, म्हणजे सोन्याची मागणी वाढत आहे आणि यामुळे सोन्याच्या किमती पुन्हा एकदा तेजीत आल्या असून आगामी काळात यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
3) सणासुदीचा हंगाम ठरणार कारणीभूत : श्रावण महिना लागला की भारतात सणासुदीचा हंगाम सुरू होत असतो. सध्या देशात गणेशोत्सवाचा काळ सुरू आहे. येत्या काही दिवसांनी नवरात्र उत्सव, दसरा आणि दिवाळीचा मोठा सण येणार आहे. या आगामी सणासुदीच्या काळात सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
भारतात दरवर्षी सणासुदीच्या काळात सोन्याची मोठ्या प्रमाणात विक्री होत असते. यामुळे आगामी सणासुदीच्या काळात सोन्याची खरेदी वाढणार आहे आणि याचा परिणाम म्हणून त्याच्या किमतीही वाढतील असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.