Gold Rate Today : सोने खरेदीसाठी सराफा बाजारात जाऊ इच्छिणाऱ्यांसाठी आजची बातमी विशेष कामाची राहणार आहे. खरे तर भारतात लग्नसराई सुरू आहे. लग्नसराईच्या हंगामात दरवर्षी सोन्याची खरेदी वाढत असते. याशिवाय पुढल्या महिन्यात गुढीपाडव्याचा सण येणार आहे त्यानंतर अक्षय तृतीयाचा सण येईल अशा परिस्थितीत आगामी काळात देखील सोने खरेदी अशीच विक्रमी पातळीवर होत राहणार आहे.
दरम्यान सोन्याची खरेदी वाढत असल्याने त्याच्या भावातही चांगली वाढ होत आहे. जागतिक बाजारातल्या घडामोडींमुळे आणि सोने खरेदीत तेजी आल्यामुळे सध्या देशांतर्गत सोन्याचे भाव वाढले आहेत. मार्च महिन्यात सोन्याचे बाजार भाव चार ते पाच हजार रुपयांनी वाढले आहेत.
दरम्यान काल या 24 कॅरेट मौल्यवान धातूची किंमत ६८,१५० रुपये प्रति १० ग्रॅम अशी होती. पण आज यामध्ये थोडीशी घसरण झालेली आहे. आज 24 कॅरेट सोन्याची किंमत 67 हजार 750 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे.
मागील ट्रेडच्या तुलनेत आजच्या किमतीत थोडीशी घसरण झालेली आहे. दुसरीकडे चांदीच्या किमती मात्र स्थिर आहेत. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७५,२७० रुपये प्रतिकिलो होती. आज देखील चांदीची किंमत एवढीच आहे.
दरम्यान आता आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील सोन्याच्या किमती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मात्र येथे एक गोष्ट विशेष लक्षात घेण्यासारखी आहे की, उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या किमती संपूर्ण भारतभर बदलत असतात.
शहरानुसार सोन्याच्या किमतीत बदल पाहायला मिळतो. यामुळे जर तुम्हाला तुमच्या शहरात सोन्याला काय भाव मिळतोय हे जर जाणून घ्यायचे असेल तर तुमच्या जवळील ज्वेलर्सशी संपर्क साधावा लागणार आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील सोन्याच्या किमती खालील प्रमाणे
राजधानी मुंबई : २२ कॅरेट सोन्याची किंमत ६१,९४४ रुपये प्रति १० ग्रॅम, २४ कॅरेट सोन्याची किंमत ६७,६३० प्रति १० ग्रॅम
पुणे : प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६१,९४४, २४ कॅरेट सोन्याचा दर ६७,६३० रुपये प्रती १० ग्रॅम
नागपूर : प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६१,९४४, २४ कॅरेट सोन्याचा दर ६७,६३० रुपये
नाशिक : २२ कॅरेट सोन्याचा दर ६१,९४४ प्रति १० ग्रॅम, २४ कॅरेट सोन्याचा दर ६७,६३० रुपये
सोन्याच्या किमती धनतेरसला पोहोचणार विक्रमी पातळीवर
तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय तृतीयाच्या कालावधीत सोन्याच्या किमती काहीशा कमी होण्याची शक्यता आहे. मात्र धनतेरसला 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 72 हजार रुपये प्रति दहा ग्रॅम पर्यंत पोहोचणार असा अंदाज आहे. एकंदरीत आगामी काळात सोन्याचा आलेख आणखी वाढणार आहे. पण, तज्ज्ञांचा हा अंदाज खरा ठरतो का हे विशेष पाहण्यासारखे ठरणार आहे.