स्पेशल

आठवड्याभरानंतर सोन पुन्हा चमकलं, सराफा बाजारात भाव 67 हजारावर पोहचले, सोन्याचे भाव 70 हजाराच्या पुढे जाणार का ? पहा….

Gold Rates Today : सोन्यात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. खरे तर सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. शिवाय येत्या काही दिवसात सणासुदीचा हंगामही सुरू होणार आहे. तसेच, लवकरच गुढीपाडवाचा मोठा सण येणार आहे. अशा परिस्थितीत, सराफा बाजारात आगामी काही दिवसात आणखी मोठ्या प्रमाणात तेजी येण्याची शक्यता आहे.

सोने आणि चांदीचे भाव आणखी वाढणार अशी शक्यता व्यक्त होत आहे. खरेतर गेल्या आठवड्याभराच्या कालावधीनंतर पुन्हा एकदा सोन चमकला आहे. सराफा बाजारात सोन्याचे भाव पुन्हा एकदा 67 हजारावर पोहोचले आहेत.

तज्ञ लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, जागतिक बाजारपेठांमध्ये घडत असलेल्या घडामोडी देशांतर्गत सोन्याचे भाव वाढवत आहेत. यामुळे सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांना या भाववाढीचा फायदा होत आहे. विशेष म्हणजे आगामी काळात आणखी भाव वाढणार असा अंदाज आहे.

त्यामुळे अनेकांची पावले आता सराफा बाजाराकडे वळली आहेत. भाव वाढणार या शक्यतेने सोने खरेदीला वेग येणार असा अंदाज आहे. खरंतर सध्या भाव 67 हजार रुपयांवर आहेत.

पण हे दर लवकरच तीन हजारांनी वाढत 70 हजाराच्या घरात पोहोचण्याची शक्यता आहे. सध्याचा लग्न सराईचा हंगाम आणि पुढील महिन्यात गुढीपाडव्याचा मोठा सण यामुळे सोने खरेदी वाढेल असा अंदाज आहे.

हिंदू सनातन धर्मात कोणत्याही शुभप्रसंगी, सण-उत्सवाला सोने खरेदी करण्याची रीत आहे. यामुळे नेहमीच सणासुदीच्या दिवसांमध्ये आणि लग्नसराई मध्ये सोने खरेदीचे नवीन विक्रम प्रस्थापित केले जात असतात.

यंदा देखील तसेच नवीन विक्रम प्रस्थापित होत आहेत. सोन्याचे भाव यंदा विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत. आता आपण मार्च महिन्यात 20 तारखेपासून सोन्याच्या किमतीत झालेली वाढ थोडक्यात समजून घेणार आहोत.

20 मार्च : 66 हजार

21 मार्च : 67 हजार 200

22 : 66 हजार 500

26 मार्च : 66 हजार 900

27 मार्च : सकाळी 66 हजार 800 अन सायंकाळी 67 हजार

म्हणजेच 20 मार्च ते 27 मार्च या कालावधीत सोने 66 हजारावरून 67 हजारापर्यंत पोहोचले आहे. 67 हजारापेक्षाही अधिकचे भाव मिळालेत, पण बाजारभावात चढ-उतार आहे.

तथापि, तज्ञ लोकांनी आगामी काळात सोन्याचे भाव 70000 रुपये प्रति दहा ग्रॅम पर्यंत पोहोचू शकतात असा अंदाज दिला आहे. त्यामुळे अनेकांची पावली आता सराफा बाजाराकडे वळू लागली आहेत. सोने गुंतवणुकीसाठी योग्य संधी पाहू इच्छिणाऱ्यांना ही एक मोठी गोल्डन अपॉर्च्युनिटी दिसत आहे. 

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com

Published by
Tejas B Shelar

Recent Posts