स्पेशल

पाकिस्तानात गुगल, युट्युब, ट्विटर सार बंद ; दाऊदवर खरच विषप्रयोग झालाय का ? पाकिस्तानी पत्रकाराने दिले मोठे अपडेट

Dawood Ibrahim Pakistan Latest Update : सध्या सोशल मीडियावर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्यावर विषप्रयोग झाल्याच्या चर्चा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत. कालपासून या चर्चा सुरु आहेत. पण सकाळपासून या चर्चांना अधिक ऊत आला आहे. सोशल मीडियात दिलेल्या माहितीनुसार, दाऊदवर पाकिस्तानच्या कराची मधील एका दवाखान्यात उपचार सुरू असल्याचे देखील सांगितले जात आहे.

खरंतर दाऊद इब्राहिम हा पाकिस्तानात राहत नाही असे पाकिस्तान सरकारने वारंवार सांगितले आहे. मात्र आता अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर विष प्रयोग झाला असून त्याच्यावर पाकिस्तानमध्ये उपचार सुरू असल्याचे वृत्त समोर आले आहे. यामुळे पाकिस्तानचे खऱ्या अर्थाने पितळ उघडे पडले आहे.

तथापि अजून पाकिस्तान सरकारच्या माध्यमातून सोशल मीडियामध्ये सुरू असलेल्या या चर्चांवर कोणतीच अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मुंबईमधील अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर अनेक आतंकवादी कारवायांमध्ये सहभागी राहिला आहे.

राजधानी मुंबईत 1993 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात देखील दाऊद इब्राहिम हा मास्टरमाइंड होता. यामुळे भारत सरकार दाऊद इब्राहिमचा गेल्या कित्येक वर्षांपासून शोध घेत आहे. सातत्याने भारत सरकारने पाकिस्तानकडे दाऊद इब्राहिम भारताला सोपवण्यासाठी पाठपुरावा देखील केला होता.

मात्र पाकिस्तान सरकारने दाऊद इब्राहिम पाकिस्तानात राहत नाही असेच सांगितले होते. आता मात्र दाऊदवर विष प्रयोग झाला असून तो कराची मधील एका रुग्णालयात उपचार घेत असल्याचे वृत्त समोर आले असून त्याची प्रकृती अतिशय चिंताजनक असल्याचे बोलले जात आहे. मात्र सोशल मीडियामध्ये सुरू असलेल्या या चर्चामागे खरच काही तथ्य आहे का ? ही बातमी खरी आहे का ?

दाऊदची प्रकृती खरच चिंताजनक बनली आहे का? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. पाकिस्तान सरकारकडून मात्र याबाबत कोणतीच माहिती दिली जात नाहीये. पाकिस्तान हे संपूर्ण प्रकरण एक प्रकारे लपवण्याचा प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे दाऊदला खरंच विषप्रयोग झाला आहे की नाही? याबाबत पाकिस्तानी पत्रकारांनी महत्त्वाची अपडेट दिली आहे.

पाकिस्तानातील ज्येष्ठ पत्रकार आरजु काजमी यांनी दाऊदवर विष प्रयोग झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. काजमी यांनी म्हटल्याप्रमाणे, “सध्या पाकिस्तानात इंटरनेट बंद आहे. गुगल, यूट्यूब, ट्विटर सारं काही बंद करण्यात आले आहे. यावरून पाकिस्तान सरकारकडून काहीतरी लपवले जातयं हे स्पष्ट होऊ लागले आहे.

पाकिस्तानात इंटरनेट बंद असल्याने तिथे काहीतरी गडबड झाली आहे, पण हे कितपत खरं आहे ते सध्या तरी कळू शकलेले नाही.” दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून दाऊद कराची मधील एका दवाखान्यात उपचार घेत असून त्याच्यावर विष प्रयोग झाला असल्याचे सांगितले गेले आहे. तूर्तास मात्र या प्रकरणावर अधिकृत अपडेट समोर आलेली नाही. पण लवकरच याबाबतचे अधिकृत वृत्त समोर येईल अशी आशा आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts