Goverenment Employee News : दसरा आणि दिवाळीपूर्वी सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी आनंदाची बातमी दिली आहे. सणासुदीच्या काळात लाखों रेल्वे कर्मचाऱ्यांना सरकारने खूशखबर दिली आहे. भारत सरकारने रेल्वे कर्मचाऱ्यांचा मोठा बोनस मंजूर केला आहे. या सदर नोकरदार मंडळीला हजारो रुपयांचा बोनस मंजूर झाला असल्याने त्यांना सणासुदीचा काळात नक्कीच याचा मोठा फायदा मिळणार आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, रेल्वे कर्मचाऱ्यांना ही भेट देण्याचा निर्णय नुकत्याच पार पडलेल्या मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली होती.
भारत सरकारने रेल्वे कर्मचाऱ्यांना तब्बल ७८ दिवसांचा बोनस देण्याची घोषणा केली आहे. दसरा आणि दिवाळी सणाच्या आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांना सरकारने ही भेट दिली असल्याने संबंधित नोकरदार मंडळीच्या माध्यमातून केंद्रातील मोदी सरकारचे आभार व्यक्त केले जात आहेत.
तथापि, त्यांना देण्यात आलेला बोनस हा खूपच कमी असून हा बोनस सध्या लागू असणाऱ्या सातवा वेतन आयोगाच्या धर्तीवर ठरवला गेला पाहिजे होता अशी मागणी देखील या सदर नोकरदार मंडळाच्या माध्यमातून यावेळी उपस्थित करण्यात आली आहे.
केंद्र सरकारच्या या निर्णयाचा फायदा 11,72,240 कर्मचाऱ्यांना होणार आहे. म्हणजे जवळपास 12 लाख कर्मचारी यामुळे लाभान्वित होणार आहेत. कर्मचाऱ्यांची कामगिरी लक्षात घेऊन केंद्रातील सरकारने बोनस दिला आहे.
त्यांना बोनस म्हणून ७८ दिवसांचा पगार मिळणार आहे. यासाठी सरकार सुमारे 2029 कोटी रुपये खर्च करणार आहे. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, सरकार दरवर्षी दसरा-दिवाळीपूर्वी उत्पादकता लिंक्ड बोनस जाहीर करते.
यानुसार हा बोनस जाहीर करण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे आता रेल्वे कर्मचाऱ्यांना कमाल 17 हजार 951 रुपयांचा बोनस मिळणार आहे.