Government Employee DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. जर तुम्हीही सरकारी कर्मचारी म्हणून कार्यरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अधिक खास राहणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जुलै 2024 पासून कितीने वाढणार हे आता ठरले आहे.
जसं की आपणास ठाऊकच आहे की सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा वर्षातून दोनदा वाढवला जात असतो आणि तो एआयसीपीआयच्या आकडेवारीनुसार ठरत असतो.
आतापर्यंत एआयसीपीआयची में 2024 पर्यंत ची आकडेवारी समोर आली होती. जून महिन्याची आकडेवारी काही जाहीर झालेली नव्हती. त्यामुळे नेमका महागाई भत्ता किती वाढणार हे काही समजतं नव्हते.
पण आता जानेवारी 2024 ते जून 2024 या सहा महिन्यांची एआयसीपीआयची सविस्तर आकडेवारी समोर आली आहे. यातून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा जुलै 2024 पासूनचा महागाई भत्ता कितीने वाढणार हे आता स्पष्ट झाले आहे.
किती वाढणार महागाई भत्ता ?
सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 50 टक्के दराने महागाई भत्ता दिला जात आहे. जानेवारी 2024 पासून हे सुधारित दर लागू आहेत. पण 50% महागाई भत्ता लागू करण्याचा निर्णय मार्च महिन्यात झाला होता. आता जुलै महिन्यापासून नवीन दर लागू होणार आहेत.
याबाबतचा निर्णय हा सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात घेतला जाणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, एआयसीपीआयचे मे महिन्याचे निर्देशांक 139.9 अंकांवर होते. जून महिन्यात यामध्ये 1.5 अंकांची वाढ झाली.
अर्थातच जून महिन्याचे निर्देशांक 141.4 अंकावर पोहचले आहे. तसेच महागाई भत्ता चा स्कोर 53.36 टक्क्यांवर पोहोचला आहे. म्हणजे आता जुलै महिन्यापासून महागाई भत्ता 53 टक्क्यांवर जाणार आहे.
सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 50 टक्के दराने महागाई भत्ता मिळत असून यामध्ये तीन टक्क्यांची वाढ होणार आहे. याबाबतचा निर्णय हा सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात घेतला जाणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेतला जाणार असून महागाई भत्ता वाढ ही जुलै महिन्यापासूनच लागू राहणार आहे.
म्हणजेच सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात जरी हा निर्णय झाला तरी देखील महागाई भत्ता वाढ जुलै 2024 पासून लागू राहणार आहे. अर्थातच ज्यावेळी हा निर्णय होईल तेव्हा महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा संबंधित नोकरदार मंडळीला दिली जाणार आहे.