Government Employee News : सरकारी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्यात सरकारकडून मोठे गिफ्ट मिळणार आहे. एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मध्ये दिलेल्या माहितीनुसार, मार्च महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली जाणार आहे. वास्तविक सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा ही महागाई भत्ता वाढ मिळते.
जानेवारी महिन्यात आणि जून महिन्यात ही वाढ दिली जाते. अशा परिस्थितीत आता सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्यापासून महागाई भत्ता वाढ मिळणे अपेक्षित आहे. नुकत्याच जारी झालेल्या कामगार मंत्रालयाच्या ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकानुसार सरकारी कर्मचाऱ्यांना आता चार टक्के महागाई भत्ता वाढ मिळणे अपेक्षित आहे.
म्हणजेच सध्या मिळत असलेल्या 38 टक्के दराहुन महागाई भत्ता 42 टक्के एवढा बनणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी मार्च महिन्यात होणार असून महागाई भत्ता वाढ ही जानेवारी महिन्यापासून लागू राहणार आहे. यामुळे दोन महिन्याची थकबाकी देखील या ठिकाणी कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे. यामुळे वेतनात मोठी वाढ होणार आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, डिसेंबर २०२२साठी ३१ जानेवारी २०२३ रोजी ग्राहक निर्देशांक जारी करण्यात आलेला आहे. या निर्देशांकानुसारचं महागाई भत्त्यात किती वाढ होणार हे ठरत असते. आता या नव्याने जारी झालेल्या निर्देशांकानुसार महागाई भत्त्यात ४.२३ टक्के वाढ बसते. दशांश स्थानी असलेले अंक मात्र महागाई भत्ता वाढ लागू करताना विचारात धरले जात नाहीत.
म्हणजेच चार टक्के एवढी महागाई भत्ता वाढ आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. यासाठी वित्त मंत्रालयाकडून प्रस्ताव तयार करण्याचं काम सुरु असल्याची माहिती देखील हाती आली आहे. प्रस्ताव तयार झाल्यानंतर हा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत ठेवला जातो आणि मग त्याला कॅबिनेटची मंजुरी मिळाल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये वाढ होईल.
४ टक्के वाढ होऊ शकते आणि ही वाढ १ जानेवारी २०२३पासून लागू होणार आहे. निश्चितच, यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ दिल्यानंतर राज्य कर्मचाऱ्यांना देखील या महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला जातो.