Government Employee News : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की केंद्र सरकारने मार्च 2023 मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांना चार टक्के महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला आहे.
हा महागाई भत्ता वाढीचा लाभ जानेवारी 2023 पासून लागू करण्यात आला आहे. अर्थातच महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील देण्यात आली आहे. दरम्यान आता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीएवाढी संदर्भात आणखी एक मोठ अपडेट हाती येत आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार पुन्हा एकदा केंद्र शासन केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट देणार आहे. केंद्र शासन आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यापासून महागाई भत्ता वाढीचा लाभ देणार आहे.
हे पण वाचा :- मोचा चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता, भारतीय हवामान विभागाचा गंभीर इशारा
जुलै महिन्यापासून महागाई भत्त्यात तीन ते चार टक्के वाढ केली जाणार आहे. सध्या या कर्मचाऱ्यांना 42 टक्के दराने महागाई भत्ता दिला जात आहे. आता पुन्हा एकदा तीन ते चार टक्के वाढ महागाई भत्त्यात दिली जाणार असल्याने महागाई भत्ता 45 ते 46% बनणार आहे.
यामुळे निश्चितच कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांसाठी देखील एक मोठी बातमी समोर येत आहे.
ती म्हणजे राज्य कर्मचाऱ्यांना लवकरच चार टक्के डीए वाढ मिळणार आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धरतीवर ही वाढ लागू होणार असून जानेवारी महिन्यापासून आता राज्य कर्मचाऱ्यांना 42 टक्के दराने डीए लागू केला जाणार आहे.
हे पण वाचा :- राज्यातील महिलांसाठी महत्वाची बातमी ; एसटीच्या हाफ तिकीटाबाबत एसटी महामंडळाने केले ‘हे’ महत्वाचे काम, आता….
एक मे 2023 ला अर्थातच महाराष्ट्र दिनी ही वाढ देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करतील असं सांगितलं जात होतं. मात्र मुख्यमंत्री महोदय यांनी ही घोषणा केली नाही म्हणून राज्य कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण पाहायला मिळत आहे.
मात्र आता लवकरच शिंदे-फडणवीस सरकार 4% डीएवाढीची घोषणा करणार आहे. यासाठीचा प्रस्ताव वित्त विभागाकडून तयार करण्यात आला असल्याची माहिती एका मीडिया रिपोर्ट मधून समोर येत आहे.
यामुळे आता जानेवारी महिन्यापासून राज्य कर्मचाऱ्यांना चार टक्के डीए वाढ लागू होईल हे स्पष्ट झाले आहे. अर्थातच राज्य कर्मचाऱ्यांना देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धरतीवर 42% महागाई भत्ता आता मिळणार आहे.
हे पण वाचा :- पुणे, मुंबईकरांसाठी खुशखबर ! ‘या’ मार्गामुळे Pune-Mumbai प्रवासातील अंतर 45 मिनिटांनी होणार कमी, केव्हा होणार सुरु? पहा….