Government Employee News : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी हाती आली आहे. जर तुम्ही शासकीय सेवेत कार्यरत असाल किंवा तुमच्या कुटुंबातील अथवा मित्र परिवारातुन कोणी सरकारी सेवेत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूपच खास ठरणार आहे.
खरेतर, ही बातमी सरकारी कर्मचाऱ्यांच्या अतिशय जिव्हाळ्याच्या विषयासंदर्भात म्हणजेच सुट्टी संदर्भात आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, दरवर्षी केंद्र आणि राज्य सरकारे त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी सुट्टीचे संपूर्ण कॅलेंडर जारी करतात, जेणेकरून ते त्यांच्या सुट्टीचे नियोजन करू शकतील. डिसेंबर महिना नुकताच सुरू झाला आहे.
येत्या काही दिवसांनी नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. नवीन वर्ष सुरू होण्यासाठी आता फक्त 25-26 दिवसांचा काळ बाकी आहे. दरम्यान या नव्या वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांना किती दिवस सुट्ट्या राहतील याबाबत शासनाकडून मोठी माहिती समोर आली आहे.
केंद्र शासनाच्या कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाच्या अंतर्गत कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी वर्ष 2025 साठी सुट्टीचे कॅलेंडर जारी केले आहे. दरम्यान, आज आपण केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना 2025 मध्ये किती दिवस सुट्ट्या राहतील ? याबाबत माहिती पाहणार आहोत.
सरकारी कर्मचाऱ्यांना 2025 मध्ये इतक्या दिवस सुट्ट्या राहतील
26 जानेवारी – प्रजासत्ताक दिन
26 फेब्रुवारी – महाशिवरात्री
14 मार्च – होळी
31 मार्च – ईद उल फितर
10 एप्रिल – महावीर जयंती
18 एप्रिल – गुड फ्रायडे
12 मे – बुद्ध पौर्णिमा
7 जून – ईद-उल-ज़ुहा या बकरीद
6 जुलै – मुहर्रम
15 ऑगस्ट – स्वातंत्र्य दिन
16 ऑगस्ट – जन्माष्टमी
5 सप्टेंबर – पैगंबर मोहम्मद यांचा जन्मदिवस किंवा ईद-ए-मिलाद
2 ऑक्टोबर – महात्मा गांधी जयंती
20 ऑक्टोबर -दिवाळी
5 नोव्हेंबर -गुरु नानक जयंती
25 डिसेंबर – ख्रिसमस