Government Employee News : भारतात गेल्या काही दिवसापासून सणासुदीचा हंगाम सुरु आहे. सध्या शारदीय नवरात्र उत्सव सुरू आहे. नवरात्र उत्सवानंतर विजयादशमी अर्थातच दसऱ्याचा सण येणार आहे. दसरा झाला की मग दिवाळीचा मोठा सण येईल. त्यामुळे सध्या संपूर्ण देशभर आनंदाचे वातावरण आहे.
दरम्यान या आनंदमयी वातावरणात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी रेल्वे विभाग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खास आहे.
कारण की रेल्वे विभागाने रेल्वे कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर केला आहे. खरे तर दरवर्षी रेल्वे कर्मचाऱ्यांना सरकारकडून बोनस जाहीर केला जात असतो यंदाही हा बोनस जाहीर करण्यात आला आहे.
3 ऑक्टोबर रोजी ही माहिती देताना केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी सांगितले होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महत्त्वपूर्ण मंत्रिमंडळ बैठकीत रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी 78 दिवसांचा बोनस मंजूर करण्यात आला आहे.
या निर्णयामुळे रेल्वे विभागांतर्गत कार्यरत असणाऱ्या 11 लाख 72 हजार 240 कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. या कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचा बोनस दिला जाईल. हा एक उत्पादकता लिंक्ड बोनस (PLB) आहे, जो उत्पादकतेच्या आधारावर कर्मचाऱ्यांना दिला जाईल.
रेल्वे मंत्रालय विविध वर्गातील 11.72 लाख कर्मचाऱ्यांमध्ये एकूण 2029 कोटी रुपयांचा बोनस वितरित करणार आहे. दरवर्षी दसऱ्याच्या आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांना हा बोनस मिळत असतो. यंदाही दसऱ्याच्या आधीच हा बोनस सदर नोकरदार मंडळीच्या खात्यात वर्ग केला जाणार आहे.
रेल्वे कर्मचाऱ्यांना किती बोनस मिळणार?
रेल्वे मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून जास्तीत जास्त 17,951 रुपये दिले जातील. याचा अर्थ रेल्वे कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून जास्तीत जास्त 17,951 रुपये मिळतील. सर्व रेल्वे कर्मचाऱ्यांना, पदाची पर्वा न करता, समान बोनस दिला जातो. यंदाही रेल्वे कर्मचाऱ्यांना त्यांच्या पदाची पर्वा न करता समान बोनस मिळणार आहे.