Government Scheme : केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकातील नागरिकांसाठी वेगवेगळे योजना राबवल्या जातात. विद्यार्थ्यांसाठी देखील केंद्रातील सरकारकडून असंख्य योजना सुरू करण्यात आल्या आहेत. 2014 मध्ये केंद्राच्या सत्तेत आलेल्या मोदी सरकारने देखील विद्यार्थ्यांसाठी अनेक कौतुकास्पद योजना सुरू केले असून या योजनांमुळे विद्यार्थ्यांचे हित साधण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात आला आहे.
पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजना ही देखील विद्यार्थ्यांसाठी सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. ही योजना आर्थिक दृष्ट्या मागास असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आले असून या योजनेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया येत्या काही दिवसात सुरू होणार अशी माहिती हाती येत आहे. महत्त्वाचे म्हणजे जानेवारी 2025 पासून या योजनेसाठी एक नवीन पोर्टल सुरू केले जाणार आहे.
त्यानंतर मग विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या अर्जांची पडताळणी होईल आणि कोणत्या एक लाख विद्यार्थ्यांना व्याज सवलत मिळणार हे जाहीर केले जाणार आहे. दरम्यान आज आपण आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या याच योजनेची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कशी आहे ही योजना?
या योजनेच्या माध्यमातून पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून दिले जाते. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी तब्बल दहा लाख रुपयांचे कर्ज मिळते. यामध्ये काही विद्यार्थ्यांना बिनव्याजी कर्ज दिले जाते तर काही विद्यार्थ्यांना अल्पशा व्याजदरात कर्ज मिळते. कारण की सरकारकडून विद्यार्थ्यांना व्याजदरात तीन टक्क्यांपर्यंतची सवलत दिली जाते.
या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या शैक्षणिक कर्जासाठी विद्यार्थ्यांना काहीही गहाण ठेवावे लागणार नाही. म्हणजे या अंतर्गत विनातारण कर्ज उपलब्ध होईल. काही विद्यार्थ्यांना या अंतर्गत बिनव्याजी कर्ज उपलब्ध होईल तर काही विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत शैक्षणिक कर्जासाठी तीन टक्क्यांपर्यंतची व्याज सवलत दिली जाणार आहे.
या योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना एक लाख रुपयांपासून ते दहा लाख रुपयांपर्यंतचे शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून दिले जाते. आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आर्थिक कारणांमुळे शिक्षण मध्येच सोडावे लागू नये हा हेतू डोळ्यासमोर ठेवून ही योजना सरकारने सुरू केली आहे.
ज्या विद्यार्थ्यांचे कौटुंबिक उत्पन्न साडेचार लाख रुपये पर्यंत आहे अशा विद्यार्थ्यांना या अंतर्गत व्याज मध्ये 100% सवलत मिळणार आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न हे आठ लाख रुपये पर्यंत आहे अशा विद्यार्थ्यांना या अंतर्गत व्याजदरात तीन टक्क्यांपर्यंतची सूट उपलब्ध करून दिली जाणार आहे.
या योजनेअंतर्गत अभ्यासक्रमाची फी, वसतिगृहाची फी, लॅपटॉपवरील खर्च, जेवण व इतर खर्चाचा विचार करून शैक्षणिक कर्जाची मर्यादा ठरवली जाते. अभ्यासक्रमाची फी आणि वसतिगृहाची फी देखील वेगवेगळ्या संस्थांमध्ये बदलते. त्यामुळे एकाच अभ्यासक्रमासाठी दोन विद्यार्थ्यांना मिळणारी रक्कम वेग-वेगळी असू शकते.
https://www.vidyalakshmi.co.in/Students/ या वेबसाईटवर जाऊन विद्यार्थ्यांना या योजनेसाठी अर्ज सादर करता येतो. वेबसाईटवर अर्ज करण्याची प्रक्रिया सुद्धा खूपच सोपी आहे. वेबसाईटवर जाऊन अर्ज सादर करायचा असल्यास सर्वप्रथम होम पेजवर असणाऱ्या नोंदणीच्या पर्यावर क्लिक करून एक छोटा अर्ज भरावा लागतो.
त्यामध्ये विद्यार्थ्यांची सर्व वैयक्तिक माहिती विचारली जाते. यानंतर मग विद्यार्थ्यांना शैक्षणिक माहिती भरून या योजनेसाठी अर्ज करता येतो. अर्ज सादर झाल्यानंतर त्या अर्जाची पडताळणी होते आणि पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना कर्ज मंजूर केले जाते.