Grape Farming : महाराष्ट्रातील शेतकरी बांधव आपल्या नवनवीन प्रयोगाच्या माध्यमातून कायमच चर्चेत राहतात. दरम्यान आता नाशिक जिल्ह्यातील एका प्रयोगशील शेतकऱ्याचा प्रयोग देखील चर्चेत आला आहे. जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील वनी येथील भूषण भाऊसाहेब देशमुख यांनी उत्पादित केलेले द्राक्ष चक्क साता समुद्रापार निर्यात झाली आहेत. विशेष म्हणजे भूषण हे गेल्या वीस वर्षांपासून निर्यातक्षम द्राक्ष उत्पादित करत आहेत.
भूषण यांची वणी-भातोडा रस्त्यावर शेतजमीन असून 12 एकर क्षेत्रात त्यांनी थॉमसन जातीची द्राक्ष लावली आहेत. दरम्यान त्यांची ही थॉमसन जातीची द्राक्ष युरोपसाठी निर्यात करणे हेतू पात्र ठरले आहेत. विशेष म्हणजे निर्यातदार व्यापाऱ्यांच्या पसंतीस त्यांचे द्राक्ष खरे उतरले आहेत. त्यांनी उत्पादित केलेल्या द्राक्षांचे आकारमान वजन आणि चव उत्कृष्ट असल्याने निर्यातदारांनी खरेदीची प्रक्रिया सुरू केली आहे.
निर्यातदारांनी भूषण यांच्या द्राक्षाला 105 रुपये प्रति किलो असा दर देखील दिला आहे. भूषण यांच्या मते निर्यातक्षम द्राक्ष उत्पादित करण्यासाठी निर्यातक्षम द्राक्ष उत्पादित करण्यासाठी अतिरिक्त खर्च करावा लागतो. रोगराईचा द्राक्ष बागावर प्रादुर्भाव होऊ नये यासाठी विशेष काळजी घ्यावी लागते. निसर्गाचा लहरीपणा, प्रतिकूल वातावरण, प्रदेशात आवश्यक असलेला द्राक्षाचा दर्जा या सर्व बाबींची काळजी घ्यावी लागते.
यासाठी तज्ञ लोकांचा सल्ला अपरिहार्य राहतो. खरं पाहता दिंडोरी तालुका निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनासाठी कायमच ओळखला जातो. शिवाय दिवसेंदिवस निर्यातक्षम द्राक्ष उत्पादक बागायतदार तालुक्यात वाढतच आहेत. मात्र निर्यातक्षम द्राक्ष उत्पादित करण्यासाठी अतिरिक्त खर्च करावा लागत असला तरी देखील त्या तुलनेचा दर द्राक्षाला मिळत नसल्याची खंत बागायतदारांनी बोलून दाखवली.
निश्चितच, द्राक्षे उत्पादक बागायतारांना निर्यातक्षम द्राक्ष उत्पादित करण्यासाठी येणारा खर्च पाहता निर्यात धोरण सुधारणा करणे अपेक्षित आहे. एकंदरीत दिंडोरी तालुक्यातून युरोपात द्राक्ष निर्यात होत असल्याने तालुक्याची मान यामुळे उंचावली आहे. शिवाय, या प्रयोगशील शेतकऱ्यांमुळे इतर शेतकऱ्यांना प्रेरणा देखील मिळणार आहे.