स्पेशल

कर्मचाऱ्यांसाठी कामाची बातमी! ग्रॅच्यूइटीची रक्कम ठरवताना वापरला जातो ‘हा’ फार्मूला; तुमच्या पगारानुसार किती रक्कम ग्रॅच्युईटी म्हणून मिळणार? पहा

Gratuity Formula Marathi : आपल्या देशात कंपनीत सेवा बजावून आपला उदरनिर्वाह भागवणाऱ्यांची संख्या मोठी आहे. कंपनीत काम करणाऱ्या अनेकांना मात्र ग्रॅच्यूटीची रक्कम कशा पद्धतीने ठरवली जाते याबाबत माहिती नसते. ठराविक कालावधीनंतर नोकरी बदलली तर ग्रॅच्युइटी मिळते का? हा देखील प्रश्न अनेकांना पडलेला असतो.

अशा परिस्थितीत आज आपण कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोणत्या आधारे ग्रॅच्युएटीची रक्कम दिली जात असते. ही रक्कम ठरवताना कोणता फॉर्मुला वापरला जातो. यासाठी शासनाच्या माध्यमातून कोणते नियम तयार करण्यात आले आहेत. याबाबत सविस्तर अशी माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर.

ग्रॅच्युइटी म्हणजे काय आणि किती वर्षे काम केल्यानंतर ग्रॅच्युइटी मिळते?

ग्रॅच्यूटी म्हणजे कर्मचाऱ्यांनी एखाद्या कंपनीत नोकरीच्या अधीन राहून अटी आणि शर्तीचे पालन केले तर त्याच्या कामाच्या मोबदल्यात रिवॉर्ड म्हणून जी रक्कम दिली जाते तिला ग्रॅच्युइटी म्हणतात. ग्रॅच्यूटी म्हणून कर्मचाऱ्यांच्या पगारातून एक ठराविक रक्कम कपात केली जाते आणि एक मोठा हिस्सा कंपनीकडून या कर्मचाऱ्याला ग्रॅच्युइटी स्वरूपात दिली जाते. किती वर्ष काम केल्यानंतर ग्रॅच्यूटीची रक्कम मिळते हा जर प्रश्न आपला असेल तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की, एखाद्या कंपनीत सलग पाच वर्ष त्या कंपनीतील अटी व शर्तीचे पालन करून नोकरी बजावलेल्या कर्मचाऱ्याला ग्रॅच्यूटीची रक्कम मिळू शकते.

म्हणजेच पाच वर्षे एखाद्या कंपनीत काम केल्यानंतर ती कंपनी सोडली तरी देखील ग्रॅच्यूटीची रक्कम संबंधित कर्मचाऱ्याला संबंधित कंपनीकडून देय राहते. याबाबत 1972 मध्ये एक कायदा तयार झाला आहे. पेमेंट ऑफ ग्रॅच्युटी ऍक्ट असे या कायद्याचं नाव असून या कायद्यात विहित केलेल्या बाबीनुसार ज्या कंपनीत किमान दहा कर्मचारी एका वर्षात दररोज काम करतात अशा प्रत्येक कंपनीमधील कर्मचाऱ्याला ग्रॅच्यूटीचा लाभ मिळतो.

समजा जर अशा कंपनीमधील कर्मचाऱ्याने पाच वर्षानंतर नोकरी बदलली, निवृत्त झाला किंवा अन्य कारणास्तव नोकरीतला त्याग पत्र दिलं मात्र त्यांना ग्रॅच्युइटीचे नियम पूर्ण केले असतील तर त्याला ग्रॅच्यूटीची रक्कम प्रदान केली जाते. यासोबतच या कायद्यामध्ये असं देखील नमूद करण्यात आल आहे की, जर एखादी कंपनी ग्रॅच्युईटीच्या कक्षेत येत नाही मात्र त्या कंपनीला आपल्या कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युएटी प्रदान करायची आहे तर ते हे काम करू शकणार आहेत.

ग्रॅच्यूटीच्या रकमेसाठी कामाच्या वर्षांची गणना कशी होते?

आम्ही आपणास सांगू इच्छितो की एखादा कर्मचाऱ्याने जर एखाद्या ग्रॅच्यूइटीच्या कक्षात येणाऱ्या एखाद्या कंपनीत सहा वर्ष आणि 8 महिने काम केलं असेल तर अशा कर्मचाऱ्याला एकूण सात वर्षासाठी ग्रॅच्युइटी ची रक्कम ठरवली जाईल. मात्र जर अशा कर्मचाऱ्याने सहा वर्षे आणि तीन महिने काम केलं असेल तर ग्रॅज्युएटीची रक्कम सहा वर्षाच्या आधारावर ठरवली जाईल. आता ग्रॅच्युइटी मिळवण्यासाठीचा फॉर्म्युला काय याविषयी जाणून घेऊया.

ग्रॅच्यूटीची रक्कम ठरवण्याचा फार्मूला खालील प्रमाणे

ग्रॅच्युटीची रक्कम ठरवण्यासाठी (शेवटचा पगार) x (१५/२६) x (कंपनीमध्ये काम केलेल्या वर्षांची संख्या) हा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे. म्हणजेच, वीस वर्षे ग्रॅच्युटीच्या कक्षेत असलेल्या एका कंपनीत काम केलेल्या कर्मचाऱ्याचा अंतिम पगार हा मूळ पगार आणि महागाई भत्तासह 55 हजार रुपये असेल तर त्याला (55000) x (15/26) x (20) = 634615 रुपये ग्रॅचूटीची रक्कम मिळणार आहे. म्हणजेच या ठिकाणी कामाचे दिवस फक्त 26 इतकेच मोजले जातात. चार दिवस महिन्यातील सुट्ट्या या ठिकाणी गृहीत धरल्या आहेत.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts